Bangladesh–India तणाव वाढला; पराष्ट्र मंत्रालयाने वरिष्ठ राजदूताला बजावले समन्स

67
Bangladesh–India तणाव वाढला; पराष्ट्र मंत्रालयाने वरिष्ठ राजदूताला बजावले समन्स
Bangladesh–India तणाव वाढला; पराष्ट्र मंत्रालयाने वरिष्ठ राजदूताला बजावले समन्स

भारत आणि बांगलादेश (Bangladesh–India) संबंधांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या तणावाबाबत चर्चा करण्यासाठी दि. १३ जानेवारी रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशचे उपउच्चायुक्त नुरूल इस्लाम (Nurul Islam) यांना समन्स बजावले आहे. त्यातच परराष्ट्र मंत्रालयाने समन्स बजावल्यानंतर दुपारच्या वेळी नुरूल इस्लाम साउथ ब्लॉकमधून निघून जाताना दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. बांगलादेशने भारत-बांगलादेश सीमेवर पाच ठिकाणी कुंपन बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर हा तणाव वाढला आहे.

( हेही वाचा : बेकायदेशीर दुकानांकडून भाडे वसूल करणाऱ्या मशिद कमिटीसह दुकानदारांना Yogi government चा इशारा

भारत- बांगलादेश (Bangladesh–India) सीमेवर ४ हजार १५६ किलोमीटर अंतरावरील पाच विशिष्ट ठिकाणी कुंपन बांधण्याचा प्रयत्न भारत करत असल्याचा आरोप झाल्यानंतर दि. १२ जानेवारी रोजी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते. यानंतर दि. १३ जानेवारी रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशचे उपउच्चायुक्त नुरूल इस्लाम (Nurul Islam) यांना समन्स बजावले.

भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा (Pranay Verma) दि. १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात पोहोचले. त्यावेळी बांगलादेशच्या परराष्ट्र सचिव जशीम उद्दीन (Jashim Uddin) यांच्याशी त्यांची बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली. यावेळी वर्मा म्हणाले की, सुरक्षेसाठी सीमेवर कुंपण बांधण्याच्या संदर्भात ‘ढाका आणि नवी दिल्ली’ यांच्यात सामंजस्य आहे. आमच्या दोन सीमा सुरक्षा दल बीएसएफ आणि बीजीबी या संदर्भात संपर्कात आहेत. त्यामुळे सीमेवरील गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी सहकार्याचा दृष्टीकोन ठेवला जाईल, असे ही वर्मा म्हणाले. (Bangladesh–India)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.