Delhi Assembly Election : मुस्लिम मतांवर राजकीय पक्षांचा डोळा

58
Delhi Assembly Election : मुस्लिम मतांवर राजकीय पक्षांचा डोळा
  • प्रतिनिधी

दिल्ली निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. आप आणि भाजपा पक्षातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. सत्ता मिळविण्यासाठी सत्तेची गणित मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा सुरु आहे. यासाठी दिल्लीमधील मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच मुस्लिम मतदारसंघांमध्ये प्रचार करण्यासाठी विशेष योजना तयार करण्यात आली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस कुठेही शर्यतीत दिसत नव्हती. परंतु यावेळी जर मुस्लिम मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला तर काँग्रेस पुन्हा एकदा या स्पर्धेत येऊ शकते. दिल्लीतील ७० मतदारसंघांपैकी ७ जागा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका बजावतात. या जागा आहेत मतिया महल, बाबरपूर, सीलमपूर, ओखला, मुस्तफाबाद, चांदणी चौक आणि बल्लीमारन. (Delhi Assembly Election)

मुस्तफाबाद

मुस्तफाबादमध्ये यावेळी असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे ही स्पर्धा कठीण झाली आहे. मुस्तफाबाद येथून पक्षाने माजी आप नगरसेवक ताहिर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. ते दिल्ली दंगली प्रकरणातील आरोपींपैकी एक आहेत. काँग्रेसने पुन्हा मेहदी यांना उमेदवारी दिली आहे, तर आपने नवीन उमेदवार आदिल अहमद खान यांना तिकीट दिले आहे.

(हेही वाचा – BCCI Working Committee : बीसीसीआय कार्यकारिणीत देवाजित साकिया सचिव तर प्रभतेज सिंग भाटिया यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड)

बाबरपूर

बाबरपूर मतदारसंघात विधानसभा मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे ४५ टक्के आहे. येथे आम आदमी पक्षाने पुन्हा मंत्री गोपाल राय यांना तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने सीलमपूरमधून माजी आप आमदार मोहम्मद इशराक यांना उमेदवारी दिली आहे. इथे मुस्लिम मतांमध्ये विभाजनाची शक्यता आहे. (Delhi Assembly Election)

ओखला

आपच्या अमानतुल्ला खानचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ओखला विधानसभा मतदारसंघात सुमारे ५५% लोकसंख्या अल्पसंख्याक समुदायाची आहे. शाहीन बाग हा याच विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे, जिथे मुस्लिमांनी निषेध आंदोलन केले होते. २०२० मध्ये, अमानतुल्ला यांनी ६६.०३% मते मिळवून या जागेवरून सर्वात मोठा विजय मिळवला होता, तर भाजपाचे ब्रह्म सिंह २९.६५% मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते. काँग्रेसचे परवेझ हाश्मी २.५९% मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

(हेही वाचा – बेकायदेशीर दुकानांकडून भाडे वसूल करणाऱ्या मशिद कमिटीसह दुकानदारांना Yogi government चा इशारा)

मतिया महल

मध्य दिल्लीतील मतिया महल जागा नेहमीच चर्चेत असते. जामा मशीद या मतदारसंघात येते. येथे मुस्लीम मतदारांची संख्या ६०% आहे. २०२० मध्ये, आपचे शोएब इक्बाल यांनी ७५.९६% मते मिळवून मतिया महल जिंकले. भाजपाचे रविंदर गुप्ता १९.२४% मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आले. आणि काँग्रेसचे मिर्झा जावेद अली ३.८५% मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

सीलमपूर

सीलमपूर मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, जिथे बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्याकाची आहे. २०२० मध्ये आम आदमी पक्षाचे मोहम्मद इशराक यांनी या विधानसभा मतदारसंघातून ५६.०५ टक्के मते मिळवून निवडणूक जिंकली. भाजपाचे कुशल मिश्रा २७.५८% मतांसह दुसऱ्या स्थानावर होते आणि काँग्रेसचे मतीन अहमद १५.६१ टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर होते. (Delhi Assembly Election)

(हेही वाचा – Rupee vs US Dollar : ढासळत्या रुपयाचा परिणाम विमानाच्या तिकिटांवर; एअर इंडियाचं स्पष्ट मत)

चांदणी चौक

चांदणी चौक जागा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. पण आता आम आदमी पक्षाचे येथे वर्चस्व आहे. आम आदमी पक्षाने पुन्हा प्रल्हाद सिंह साहनी यांना निवडणुकीत उभे केले आहे. तर काँग्रेसने मुदित अग्रवाल यांना तिकीट दिले आहे. भाजपाने अद्याप येथून उमेदवार उभा केलेला नाही.

बल्लीमारन

एक काळ असा होता जेव्हा बल्लीमरन जागेवर काँग्रेसचे पूर्ण वर्चस्व होते. काँग्रेस पक्षात मंत्री असलेले हारुन युसूफ यांना येथून निश्चित विजयी मानले जात होते. यावेळीही आपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा जुन्या चेहऱ्यावर बाजी मारली आहे. भाजपाने अद्याप येथून उमेदवार उभा केलेला नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.