महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कर्मचाऱ्यांना BR- 624 दि. 31.12.1996 प्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, त्यादृष्टीने ऊर्जा विभागाला योग्य ते दिशा निर्देश द्यावेत, अशी मागणी मंडळाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना लेखी निवेदनाद्वारे केली. ऊर्जा खातेही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच आहे.
(हेही वाचा शक्तिपीठ महामार्गाला CM Devendra Fadnavis यांचा हिरवा कंदील; महामार्गाचे काम सुरु करण्याचे निर्देश)
मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. फक्त आपल्याकडूनच आमच्या समस्येचे निराकरण होऊ शकते, म्हणून अत्यंत आतुरतेने आणि विश्वासपूर्वक आम्हाला योग्य न्याय मिळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. यामुळे सर्व निवृत्त व सेवारत कर्मचाऱ्यांची हाल अपेष्टा संपुष्टात येऊन आम्ही स्वाभिमानाने आणि आत्मनिर्भरतेने आमचे जीवन जगू शकतो, असेही या निवेदनात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community