PM Narendra Modi १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर

42
PM Narendra Modi १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर
PM Narendra Modi १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दि. १५ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान मुंबईच्या नौदल गोदीत आयएनएस सुरत (INS Surat) , आयएनएस निलगिरी (INS Nilgiri) आणि आयएनएस वाघशीर (INS Vagsheer) या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रर्पण करतील. तसेच त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास पंतप्रधानांच्या हस्ते खारघर येथील इस्कॉन मंदिराचे (ISKCON Temple) उद्धाटन होणार आहे.

( हेही वाचा : गोमातेच्या शरीरावरील केस कापत कट्टरपंथी Syed Nasru ने केले जखमी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारताच्या सांस्कृतिक वारशाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान दि. १५ जानेवारी रोजी श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर, खारघर, नवी मुंबई येथील इस्कॉन प्रकल्पाचेही (ISKCON Temple) उद्घाटन करतील. नऊ एकरांवर वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश आहे. विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे. (ISKCON Temple)

नौदल युद्धनौकांचे काय आहे वैशिष्टये

आयएनएस निलगिरी (पी१७ए) ‘स्टेल्थ फ्रिगेट’ प्रकारातील पहिले जहाज असून, भारतीय नौदलाने त्याची निर्मिती केली असून त्यात संकटकाळी तगून रहाण्याची क्षमता आहे. सागरी सुरक्षा (सीकीपिंग) आणि स्टील्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत, जे स्वदेशी फ्रिगेट्सच्या आधुनिक प्रकाराचे प्रतिबिंब दर्शवितात. तसेच आयएनएस सूरत (पी१५बी) हे क्षेपणास्त्र विनाशक प्रकल्पातील चौथे आणि सर्वोत्तम जहाज असून, जगातील सर्वात मोठ्या, सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यातील ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. अत्याधुनिक शस्त्र-सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी ते सुसज्ज आहे. आयएनएस वाघशीर (पी७५) स्कॉर्पीन प्रकल्पाची सहावी आणि अंतिम प्रकारातील पाणबुडी आहे. पाणबुडी बांधणीतील भारताच्या वाढत्या कौशल्याचे ती प्रतिनिधित्व करते. फ्रान्स नौदलाच्या समूहाच्या सहकार्याने तिची बांधणी करण्यात आली आहे. (PM Narendra Modi)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.