Shiv Sena मोठा धक्का पुढची विधानसभा निवडणुक मी लढवणार नाही! नक्की कोणी आणि का म्हटलं?

167
Shiv Sena मोठा धक्का पुढची विधानसभा निवडणुक मी लढवणार नाही! नक्की कोणी आणि का म्हटलं?
Shiv Sena मोठा धक्का पुढची विधानसभा निवडणुक मी लढवणार नाही! नक्की कोणी आणि का म्हटलं?

शिवसेनेचे माजी मंत्री आणि सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंभई येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. (Shiv Sena)

मंत्रीपदासाठी नाराजी

महायुतीच्या सत्तेची स्थापना झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सत्तार यांना मंत्रिपद मिळाले होते. मात्र, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद दिले गेले नाही. यामुळे सत्तार यांच्यात नाराजी निर्माण झाली. अडीच वर्षांनी पुन्हा मंत्रीपदाची संधी दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते. परंतु, “राजकारणात अडीच वर्षांत काहीही होऊ शकते,” असे म्हणत सत्तार यांनी थांबण्याची तयारी नसल्याचे सूचित केले होते.  (Shiv Sena)

(हेही वाचा- Traffic Jam मध्ये वाया जातात भारतियांचे अनेक मनुष्यतास; ‘ही’ ३ शहरे जगातील पहिल्या पाचात)

शक्तीप्रदर्शनामुळे नाराजी

मंत्रीपद डावलल्यानंतर सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या वाढदिवसानिमित्त मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे नाव, धनुष्यबाण, आणि शिंदे यांच्या फोटोचा वापर टाळला होता. या कृतीमुळे शिवसेनेत नाराजी होती, तसेच शिंदे यांनाही हे शक्तीप्रदर्शन नापसंत होते. (Shiv Sena)

निवडणूक निकाल आणि न्यायालयीन वाद

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांचा विजय केवळ दोन हजार मतांनी झाला होता. विरोधी उमेदवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) सुरेश बनकर आणि महायुतीच्या इतर नेत्यांनी त्यांच्या विजयावर आक्षेप घेत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा- Shiv Sena (UBT) : शिवसेनेला घरचा आहेर; शिवसेना जवळपास काँग्रेस झाली आहे, असं कोण म्हणालं ?)

काँग्रेसशी जवळीक आणि नव्या समीकरणांची शक्यता

सत्तार यांनी मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांच्याशी जवळीक साधल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या कृतीमुळे स्वपक्षाला सूचक इशारा दिला जात असल्याची चर्चा आहे. सत्तार यांचा हा नवीन डाव आहे की राजकीय भविष्याचा विचार, यावर विविध तर्क लावले जात आहेत. (Shiv Sena)

निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाचे कारण

अंभई येथील कार्यक्रमात सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, “पुढील विधानसभा निवडणूक मी लढणार नाही,” असे जाहीर केले. यामुळे त्यांच्या समर्थकांसह विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ते सक्रिय राजकारणातून बाजूला होणार का, की हा फक्त राजकीय डावपेच आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Shiv Sena)

(हेही वाचा- …तर कट्टरपंथींनी पाकिस्तानात जाऊन राहावे; Swami Avimukteshwarananda Saraswati Maharaj यांचे विधान)

महायुतीची राजकीय समीकरणे बदलतील

अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेमुळे शिवसेनेच्या राजकीय गोटात गोंधळ उडाला आहे. मंत्रीपद डावलल्याने नाराज असलेल्या सत्तार यांनी शक्तीप्रदर्शन, काँग्रेसशी जवळीक, आणि निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत आपली नवी भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे आगामी काळात शिवसेना आणि महायुतीतील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.