Karnataka Accident : कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या कारचा अपघात

97
Karnataka Accident : कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या कारचा अपघात
Karnataka Accident : कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या कारचा अपघात

कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला आज, मंगळवारी पहाटे 5 वाजता अपघात झाला. वाहनासमोर अचानक कुत्रे आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने कारची झाडाला धडक बसल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती पुढे आली आहे. (Karnataka Accident)

(हेही वाचा – Shiv Sena मोठा धक्का पुढची विधानसभा निवडणुक मी लढवणार नाही! नक्की कोणी आणि का म्हटलं?)

यासंदर्भात कित्तूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी हेबाळकर या बंगळूर येथून आपल्या कारने बेळगावकडे परतत होत्या. दरम्यान त्यांची कार पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूरनजीक अंबरगट्टीजवळ जवळ आली असता कारच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाने आपले वाहन डाव्या बाजूला वळवल्याने कारची रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक बसली.

अपघाताच्या वेळी लक्ष्मी हेब्बाळकर व त्यांचे भाऊ आमदार चन्नराज हटीहोळी हे जखमी झाले. तर चालक शिवप्रसाद व सुरक्षा रक्षक इराप्पा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच कित्तूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांच्यासह सीपीआय शिवानंद व रामदुर्गचे डीएसपी चिदंबरम यांनी घटनास्थळी भेट देवुन जखमींना तातडीने उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (Karnataka Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.