Jammu and Kashmir मध्ये लागला लॉस एंजेलिससारखा भीषण वणवा; २ गावे भस्मसात, हजारो लोकांची वाताहात

88
Jammu and Kashmir मध्ये लागला लॉस एंजेलिससारखा भीषण वणवा; २ गावे भस्मसात, हजारो लोकांची वाताहात
Jammu and Kashmir मध्ये लागला लॉस एंजेलिससारखा भीषण वणवा; २ गावे भस्मसात, हजारो लोकांची वाताहात

अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियातील (California) जंगलांमध्ये लागलेली आग सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंतेचा विषय ठरली आहे. या अग्नितांडवामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे लॉस एंजेलिस (Los Angeles) मधील आगीची घटना ताजी असतानाच आता काश्मीरमध्ये सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. काश्मीरमध्ये लागली आहे. या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गावे भस्मसात झाली आहेत. (Jammu and Kashmir)

( हेही वाचा: Good Governance Index : राज्यातील ३२ जिल्हे गुन्हेगारी रोखण्यात अपयशी; शासकीय अहवालातून समोर आले वास्तव

काश्मीरच्या (Kashmir) किश्तवाड येथे सध्या कडाक्याच्या थंडीमुळे तापमान थंड झालेले आहे. या परिसरात सातत्याने हिमवृष्टी होत आहे. मात्र एवढ्या थंडीतही ही भीषण आग लागली आहे. किश्तवाडमधील दुर्गम भागात वसलेल्या बाडवन येथील मार्गी आणि मालवन गावांमध्ये ही आग लागली आहे. या भीषण वणव्यात अनेक घरं जळून खाक झाली आहेत. तर शेकडो लोकांना या आगीचा फटका बसला आहे. लोकांनी स्थानिक पातळीवर बचावकार्य करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. या अग्नितांडवात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्यापतरी आलेलं नाही. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकलेले नाही. (Jammu and Kashmir)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.