Sambhal Violence प्रकरणी आतापर्यंत ६० आरोपींवर कारवाई

68
Sambhal Violence प्रकरणी आतापर्यंत ६० आरोपींवर कारवाई
Sambhal Violence प्रकरणी आतापर्यंत ६० आरोपींवर कारवाई

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये (Sambhal Violence) दि. २४ नोव्हेंबरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात ५ जणांचा मृत्यू झाला. अनेक पोलिस कर्मचारीही यावेळी हिंसाचारात जखमी झाले. . सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात स्थानिक कट्टरपंथींनी हल्ला केला होता. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाला कुठल्याही प्रकारची बाधा पोहचणार नाही, असे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सांगितले. तसेच कट्टरपंथींवर कारवाई करण्याचा इशारा ही योगींनी दिला. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ६० जणांवर कारवाई करण्यात आली. काही आरोपी हे दिल्ली आणि परराज्यांमध्ये पळून गेले होते, त्यांना सुद्धा बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. (Sambhal Violence)

( हेही वाचा : इस्त्रोच्या अध्यक्ष म्हणून Dr. V Narayanan यांनी स्वीकारला पदभार

दरम्यान दि. १३ जानेवारी रोजी अमिर अन्सारी (Aamir Ansari) आणि मोहम्मद इम्रान (Mohammad Imran) या दोघांना मोहल्ला कोटगरर्बी येथून अटक करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या टोळीमध्ये दोघांचा समावेश होता. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दोघेही आरोपी शहरातून फरार झाले होते. मात्र आरोपी घरी परतताच त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संभलच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समाजकंटकांची ओळख पटली असून आतापर्यंत एकूण ६० जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये ४ महिलांचा सुद्धा समावेश आहे. एकूण ८९ जणांची ओळख पटली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. (Sambhal Violence)

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.