मुंबई महापालिकेच्या (BMC) भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (Veermata Jijabai Bhosle Park and Zoo) पार्किंगच्या शुल्कात आठ वर्षांनंतर चारपट वाढ करण्यात आली आहे. चारचाकीसाठी तीन तासांसाठी २० रुपयांवरून ८० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, तर दुचाकीसाठी १० रुपयांवरून ३० रुपये मोजावे लागणार आहेत. (Parking charges)
पर्यटकांसाठी (Tourist) आकर्षण ठरलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबईसह देशभरातील पर्यटक येतात. त्यामुळे रोज येथे मोठी गर्दी होते. या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर पेंग्विनसह वाघ, बिबट्या, हत्ती, हरणे, तरस, माकड, सरपटणारे प्राणी आणि शेकडो पशु-पक्षी व दुर्मीळ, औषधी झाडे पाहता येतात. येथे येणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील पर्यटकांकडे स्वतःची वाहने असतात. त्यांना वाहने पार्किंगसाठी व्यवस्था आहे. मात्र, याआधी दिवसभरासाठी २० रुपये पार्किंग (Mumbai Zoo Parking Charges) शुल्क आकारले जात होते.
(हेही वाचा – मुंबईकरांना मिळणार प्रदूषणाची माहिती; १४ Digital Board झळकणार)
आता जानेवारीपासून यात चारपट म्हणजे ८० रुपये आकारण्यात येत आहेत. तर दुचाकीसाठी १० रुपयांवरून ३० रुपये दरवाढ लागू केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच पालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्रवेश करण्यासाठी असलेल्या गेटमधून परिसरातील दुकानदारही आपली वाहने आणून लावतात. या ठिकाणी संपूर्ण दिवसभर वाहने पार्क करून फक्त दहा ते वीस रुपये जमा केले जात होते. त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसानही होत होते. शिवाय काही जणांकडून या पार्किंगचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याची माहिती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी (Director of Parks and Zoo Dr. Sanjay Tripathi) यांनी दिली.
(हेही वाचा – खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार; Pratap Sarnaik यांचे निर्देश)
भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या तिकीट दरातही वाढ
उद्यान व प्राणिसंग्रहालयाला लागून हेरिटेज भाऊ दाजी लाड संग्रहालय (Bhau Daji Lad Museum) आहे. या संग्रहालयाच्या तिकीट दरातही आता वाढ करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी याआधी पाच रुपयांचे तिकीट दर होते, आता दहा रुपये करण्यात आले आहेत, तर प्रौढांसाठी असणारे दहा रुपयांचे तिकीट आता २० रुपये झाले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community