पालकमंत्र्यांची नावे १६ जानेवारीपर्यंत जाहीर होणार; Chandrashekhar Bawankule यांची माहिती

61
पालकमंत्र्यांची नावे १६ जानेवारीपर्यंत जाहीर होणार; Chandrashekhar Bawankule यांची माहिती

राज्याच्या सर्वच जिल्ह्यांना पालकमंत्रिपदाची प्रतीक्षा असून, अद्यापदेखील हा तिढा सुटलेला नाही. आता १५ ते १६ जानेवारीपर्यंत पालकमंत्रिपद विषयाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी (१३ जानेवारी) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – छत्तीसगडमध्ये पाच Naxalites ठार; शस्त्रे, स्फोटके जप्त)

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मागील आठवड्यातच केवळ दोन दिवसांतच पालकमंत्र्यांची नावे जाहीर होतील, असा दावा केला होता. मात्र, अद्यापपर्यंत नावांची घोषणा झालेली नाही. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले की, ‘महायुतीतील पालकमंत्र्यांचा विषय मार्गी लागलेला आहे. १५ ते १६ जानेवारीपर्यंत पालकमंत्रिपद विषयाला अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर आमच्या आतापर्यंत दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. कोणाला कुठल्या जिल्ह्यात नियुक्त करायचे याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे २६ जानेवारीला झेंडावंदन कोणी करायचे यावर तोडगा निघालेला असेल,’’

(हेही वाचा – Jammu Kashmir मध्ये नियंत्रण रेषेजवळ स्फोट; ६ जवान जखमी)

पुढे बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपा तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल त्यावेळी आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरू. कार्यकर्त्याच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांबरोबर जाऊन काम करू. भाजपा क्रमांक एकचा पक्ष आहे. असे असले तरी महायुती म्हणून आम्ही निवडणुकीत पुढे जाऊ. ’’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच भाजपाकडून सदस्यता नोंदणीवर भर देण्यात येत आहे. दीड कोटी सदस्य संख्येचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १५ दिवसांत ही संख्या गाठण्यात यश येईल. त्यानंतर बूथप्रमुख, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.