- प्रतिनिधी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने ‘एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
देशभरातील १००० स्टार्टअप्सचा सहभाग
तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण आणि पर्यटन यांसारख्या विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप्स या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेडचे सह-संस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर, गुगलचे जागतिक प्रमुख अपूर्वा चमरिया, AWS चे अजय कौल, ईव्ही कॅप वेंचर्सचे विक्रम गुप्ता, अवेंडसचे राणू वोहरा, सुपर बॉटम्सच्या पल्लवी उतगी, ओपन सीक्रेटच्या अहाना गौतम आदी अनेक उद्योजक आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार; Pratap Sarnaik यांचे निर्देश)
पॅनेल चर्चा आणि नावीन्यपूर्ण सादरीकरणे
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, दिवसभरात गुंतवणूकदारांच्या गरजा, युवा उद्योजकांच्या यशकथा आणि नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित विशेष सत्रे आयोजित केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अधिक महत्त्वाचा ठरतो आहे. (CM Devendra Fadnavis)
कार्यक्रम थेट प्रक्षेपित
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार असून, सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील आणि आयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community