भारतातील निवडणुकीवरील टिप्पणीमुळे संसदीय समिती बजावणार समन्‍स; Mark Zuckerberg यांच्या अडचणी वाढणार

51

भारतातील लोकशाही निवडणुकीवर भाष्‍य केल्‍याने फेसबुकचे संस्थापक आणि META चे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांच्‍यासमोरील अडचणीत वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. नुकतेच त्यांनी एका पॉडकास्टमध्ये भारतीय निवडणुकीबाबत केलेल्‍या भाष्‍यावर टीका होत आहे. या प्रकरणी संसदीय समिती मेटा कंपनीला समन्‍स बजावणार आहेत.

संसदीय समिती फेसबुकची मूळ कंपनी मेटाला समन्स बजावणार आहे. ही माहिती आयटी आणि कम्युनिकेशन प्रकरणांवरील संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये दिली आहे. त्याने याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले आहे. यामध्‍ये त्यांनी लिहिले आहे की, “या चुकीच्या माहितीसाठी माझी समिती मेटाला समन्‍स बजावले. कोणत्याही लोकशाही देशात चुकीची माहिती देशाची प्रतिमा मलिन करते. या चुकीबद्दल त्या संघटनेला भारतीय संसदेची आणि येथील लोकांची माफी मागावी लागेल.”

(हेही वाचा CM Devendra Fadnavis यांच्याकडून पानिपत शौर्य दिनानिमित्त अभिवादन)

जो रोगनच्या पॉडकास्टमध्ये मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) म्हणाले होते की, सरकारांचा हा पराभव दर्शवितो की कोविड महामारीनंतर लोकांचा विश्वास कमी झाला आहे. वाढती महागाई, साथीच्या आजाराशी संबंधित आर्थिक धोरणे आणि सरकारांनी कोविड-१९ ला कसे हाताळले यामुळे लोकांचा विश्वास कमी झाला आहे, असेही ते म्‍हणाले होते. आयटी आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही X वर पोस्ट करताना Meta ला टॅग केले. त्यांनी लिहिले की, या प्रकरणात, अश्विनी वैष्णव यांनी आधीच मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना उत्तर दिले होते. त्यांनी X वर पोस्टमध्‍ये लिहिले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारतात २०२४ मध्ये निवडणुका झाल्या ज्यामध्ये ६४ कोटी लोकांनी भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या एनडीए सरकारवर भारतातील जनतेने विश्वास दाखवला. कोविडनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भारतासह जगातील बहुतेक सत्ताधारी सरकारे पराभूत झाली आहेत, हा मार्क झुकरबर्गचा दावा चुकीचा आहे. निशिकांत दुबे यांनी या प्रकरणात मेटाला समन्स बजावण्याची शिफारस केली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.