Comprehensive Thalassemia Care : बोरिवलीतील महापालिकेच्या बालरोग रक्तदोष-कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात नि: शुल्क उपचार

311
Comprehensive Thalassemia Care : बोरिवलीतील महापालिकेच्या बालरोग रक्तदोष-कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात नि: शुल्क उपचार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरिवली (पूर्व) येथे महानगरपालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र’ हे रुग्णालय कार्यरत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी सुमारे २५ ते ६० लाख रुपयांदरम्यान खर्च येऊ शकतो. परंतु, हेच उपचार या केंद्रात नि:शुल्क होतात. विशेषतः मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या पालकांकरिता याठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे. रुग्ण आणि रुग्णांसोबतचे नातेवाईक यांच्या निवासस्थानाची व्यवस्था असणारी समर्पित इमारत वापरासाठी उपलब्ध झाली आहे. (Comprehensive Thalassemia Care)

या रुग्णालयात उपचारांसाठी येणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी निवास, जेवण इत्यादी सर्वंकष व्यवस्था उपलब्ध करून देणारी ‘होम अवे फ्रॉम होम’ या इमारतीचे लोकार्पण मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते मंगळवारी १४ जानेवारी २०२५ रोजी पार पडले. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून एखाद्या प्रकल्पाची अंमलबजावणी किती प्रभावीरित्या करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बोरिवली (पूर्व) येथे महानगरपालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राची रुग्ण निवासी इमारत ही आहे. विशेषतः मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या पालकांकरिता ही व्यवस्था अतिशय मोठा दिलासा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी याप्रसंगी केले. याप्रसंगी उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. भाग्यश्री कापसे, आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केंद्राच्या संचालक डॉ. ममता मंगलानी, उपसंचालक डॉ. संतोष खुडे, ॲक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशनचे सहसंस्थापक अंकित दवे, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो मधील सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभाग प्रमुख माबेल अब्राहम, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. (Comprehensive Thalassemia Care)

New Project 2025 01 14T194551.553

(हेही वाचा – Garbage Free Hour : मुंबईत आता कचरा मुक्त तास मोहीम; रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळांसह खाऊ गल्ल्यांवर विशेष लक्ष)

कार्यक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून ‘होम अवे फ्रॉम होम’ या रूग्ण निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. इमारतीच्या दोन्ही मजल्यांवर असलेल्या रूग्ण निवासी खोल्या, स्वयंपाकघर, मुलांसाठी मनोरंजनाची साधने आणि इतर सर्व व्यवस्थांची देखील आयुक्त गगराणी यांनी पाहणी केली. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी संबोधित करताना म्हणाले की, शासकीय व सामाजिक सहकार्यातून अतिशय उदात्त प्रकल्प उभारता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महानगरपालिकेचे ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र होय. त्यातही रुग्ण असलेली मुले व त्यांच्या पालकांच्या निवासाची सोय असणारी इमारत ही सार्वजनिक-खासगी भागीदारीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या इमारतीचे लोकार्पण करता आले, हे मी माझे भाग्य समजतो. मुंबईमध्ये मुलांच्या उपचारांसाठी येताना निवास, जेवण आणि इतर व्यवस्था कशी होईल? ही चिंता घेऊन येणाऱ्या कुटुंबाची या सर्व चिंतेतून सुटका करण्याचे मोठे काम या इमारतीमुळे होणार आहे. परिणामी पालकांना आपल्या मुलांच्या उपचारांवर पर्यायाने त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करता येईल. त्यामुळे या इमारतीची संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत, असेही गगराणी यांनी नमूद केले. (Comprehensive Thalassemia Care)

कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राच्या डॉ. ममता मंगलानी यांनी प्रास्ताविक केले. केंद्राच्या संकल्पनेपासून वाटचालीपर्यंतची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. खासगी रूग्णालयांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी सुमारे २५ ते ६० लाख रूपयांदरम्यान खर्च येऊ शकतो. परंतु, हेच उपचार या केंद्रात नि:शुल्क होतात. केंद्राच्या उभारणीमध्ये तसेच रुग्ण निवास इमारतीच्या निर्मितीमध्ये सामाजिक घटकांचे मोठे सहकार्य लाभले आहे, त्या बळावर यापुढेही केंद्राची वाटचाल सुरू राहील, असे डॉ. मंगलानी यांनी नमूद केले. (Comprehensive Thalassemia Care)

(हेही वाचा – राणीबागेतील Parking charges महागले; चारचाकीसाठी २० रुपयांवरून थेट ८० रुपये)

प्रत्यारोपण उपचार केंद्राची रुग्ण निवास इमारत 

मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर आणि महानगरपालिकेने बांधलेल्या या इमारतीमध्ये सर्व सुसज्ज व्यवस्था उभी करण्यासाठी ॲक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांनी सर्व सहकार्य पुरवले आहे. रूग्ण आणि रूग्णांसोबतचे नातेवाईक यांच्या निवासस्थानाची व्यवस्था असणारी समर्पित इमारत वापरासाठी उपलब्ध झाली आहे. या दुमजली इमारतीमध्ये रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी एकूण १८ खोल्या आहेत. इमारतीमध्ये स्वयंपाकघर आहे. त्याठिकाणी रेफ्रिजरेटर, भांडीदेखील पुरविण्यात आली आहेत. इमारतीमध्ये लॉकर, वॉशिंग मशीन तसेच लहान मुलांकरिता मनोरंजनाच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (Comprehensive Thalassemia Care)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.