बोरिवलीतील Comprehensive Thalassemia Care Centre मध्ये कर्करोग आजारांच्या १३३१ बालकांवर उपचार

208
बोरिवलीतील Comprehensive Thalassemia Care Centre मध्ये कर्करोग आजारांच्या १३३१ बालकांवर उपचार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरिवली (पूर्व) येथे महानगरपालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष-कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र’ हे रुग्णालयात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. साडेसात वर्षांमध्ये बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी ६८ हजार ९५९ उपस्थितीची नोंद (फॉलोअपसह) तर नवीन ७,५०० रुग्णांची नोंद झाली असून आजवर थॅलेसेमिया उपचारासाठी १९५५ रुग्ण दाखल झाले आहेत. तर कर्करोग असणारी १३३१ बालके आणि रक्तदोष असणाऱ्या १४८३ बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. (Comprehensive Thalassemia Care Centre)

महानगरपालिकेचे “कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र” अर्थात “सीटीसी, पीएचओ व बीएमटी उपचार केंद्र” हे अविरतपणे कार्यरत आहे. नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. याचाच एक भाग म्हणून थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगाने ग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ मध्ये महानगरपालिकेने बोरिवली (पूर्व) परिसरात हे उपचार केंद्र सुरू केले. या केंद्रात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Comprehensive Thalassemia Care Centre)

या केंद्राला समाजातील सर्व स्तरातील सहकार्य मिळाले आहे. या केंद्राकरिता टाटा ट्रस्ट यांनी प्रारंभी १० कोटी रुपये देणगी दिली होती. पंतप्रधान सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी यांचेसह कॉर्पोरेट जगतातून व समाजातील अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून आतापर्यंत सुमारे ५० कोटी रुपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. परिणामी रुग्णांना सर्वोत्कृष्ट उपचार निशुल्कपणे पुरवणे शक्य होत आहे. (Comprehensive Thalassemia Care Centre)

(हेही वाचा – राणीबागेतील Parking charges महागले; चारचाकीसाठी २० रुपयांवरून थेट ८० रुपये)

उपचार केंद्राची आजवरची कामगिरी –
  • साडेसात वर्षांमध्ये बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी ६८ हजार ९५९ उपस्थितीची नोंद (फॉलोअपसह). तर नवीन ७,५०० रुग्णांची नोंद.
  • आजवर थॅलेसेमिया उपचारासाठी १९५५ रुग्ण दाखल.
  • कर्करोग असणारी १३३१ बालके आणि रक्तदोष असणाऱ्या १४८३ बालकांवर उपचार.
  • जून २०१८ पासून जानेवारी २०२५ पर्यंत ३९१ बोनमॅरो प्रत्योरोपणाची (बोन मॅरो ट्रान्सप्लांट/बीएमटी) कार्यवाही पूर्ण. या केंद्रात दरवर्षी सुमारे ६० ते ८० प्रत्यारोपण.
  • बीएमटी फिजिशियन, बालरोग रक्तदोष कर्करोग तज्ज्ञांसह एक पथक या सेवेसाठी समर्पित.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.