भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (Rani Baugh) काचेच्या टनेलमध्ये मत्सालय बनवण्यात येणार आहे. पेंग्विन कक्षाशेजारीच हे देश विदेशातील रंगीबेरंगी माशांचे आंतरराष्ट्रीय मत्सालय उभारण्यात येणार आहे. सिंगापूर आणि दुबईच्या धर्तीवर पेंग्विन कक्षाशेजारीच साडेपाच हजार चौरस फुट जागेवर हे मत्सालय उभारण्यात येणार असून पेंग्विनसह या मत्सालय पाहण्याची पर्वणीच पर्यटकांना लाभणार आहे.
राणीबागेत (Rani Baugh) जुलै २००१६मध्ये पेंग्विन कक्षात कोरियावरून आणलेले ८ हॅबोल्ट जातीचे पेंग्विन आणले होते. त्यामुळे पेंग्विन कक्षातील पेंग्विनची संख्या आता २५ पर्यंत पोहोचली असून पर्यटकांचे एक प्रकारे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. पेंग्विनची संख्या वाढल्याने यासाठी असलेली जागा कमी पडत असून या कक्षाशेजारील जागेत या पिंजऱ्याचा विस्तार करण्यात येत आहे. याच पेंग्विन कक्षाशेजारीच काचेच्या टनेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालयात बनण्यात येत असून यामध्ये देशविदेशातील मासे पहायला मिळणार आहे. यात काचेचे दोन वॉक थ्रु टनेन असतील. (Rani Baugh)
पेंग्विन कक्षासमोरच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मत्सालयाकरता एक काचेचा बोगदा १४ मीटरचा असेल तर दुसरा बोगदा ३६ मीटर लांब असेल. नैसर्गिक अनुभवासाठी, त्यात दगडांची रचना तसेच सागरी जीवनारखया घटकांचा समावेश असेल. मत्सालयातील पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी १० लाख लिटर क्षमतेची एक विशेष जलजीवरक्षक यंत्रणा बसवली जाईल, याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया अंतिम होवून प्रशासक यांच्या मंजुरी नंतर याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात येत आहे. (Rani Baugh)
Join Our WhatsApp Community