स्वातंत्र्यवीर मंत्री झाले असते, तर….; सावरकरांचा उल्लेख, दाऊदचा दाखला, Vinod Tawde यांची शरद पवारांवर कडवी टीका

काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का?

82
स्वातंत्र्यवीर मंत्री झाले असते, तर....; सावरकरांचा उल्लेख, दाऊदचा दाखला, Vinod Tawde यांची शरद पवारांवर कडवी टीका
स्वातंत्र्यवीर मंत्री झाले असते, तर....; सावरकरांचा उल्लेख, दाऊदचा दाखला, Vinod Tawde यांची शरद पवारांवर कडवी टीका

दाऊदच्या (Dawood) हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटरमध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत, अशा परखड शब्दांत भाजपा नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी शरद पवारांचा (Sharad Pawar) समाचार घेतला आहे.


शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका करतांना तडीपारीची शिक्षा झालेले गृहमंत्री याआधी झालेले नाहीत, असे म्हटले होते. याला भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी एक्सवर पोस्ट करून प्रत्युत्तर दिले आहे.

विनोद तावडे यांनी त्यांच्या ‘X’ वरील पोस्टमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचाही उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोन जन्मठेपांची – काळ्या पाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर मंत्री झाले असते तर त्यांच्याबाबतही पवार साहेबांनी हेच वक्तव्य केले असते का? श्रद्धेय अटल जी, अडवाणी जी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात 17 महिने तुरुंगात होते, ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयी देखील हेच म्हटले असते का? हे पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला नक्की सांगितले पाहिजे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.