- प्रतिनिधी
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपा नेत्यांनी चांगलेच प्रतिउत्तर दिले आहे. शिवाय राहुल गांधी विरोधी पक्षनेता म्हणून देखील अयोग्य असल्याची जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांच्यामुळे बुधवारी दिल्लीतील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
(हेही वाचा – Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये अब्जावधींची उलाढाल; धार्मिक सोहळ्याचे आर्थिक महत्त्व)
केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी देखील जोरदार टीका केली आहे. भाजपा नेते हरदीप पुरी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावे, असे म्हटले आहे. राहुल गांधींच्या कोणत्याही विधानाचा उल्लेख न करता ते म्हणाले की, त्यांना जाऊन त्यांची मानसिक स्थिरता तपासायला सांगा. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे.
(हेही वाचा – आता टप्प्याटप्प्याने देता येणार पैसे; MHADA ची चार हजार घरांची Lottery निघणार; जाणून घ्या सविस्तर माहिती )
भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, आपल्याकडे अपरिपक्व विरोधी पक्षनेता असणे दुर्दैवी आहे. भारत अधिक जबाबदार, निष्ठावान विरोधी नेत्याला पात्र आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना भाटिया म्हणाले की, राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, तरीही ते म्हणतात की ते भारताच्या विरोधात लढत आहेत. ते म्हणाले की, आपल्या देशाच्या अखंडतेच्या विरोधात असलेल्या जॉर्ज सोरोससारख्या शक्तींना मार्गदर्शन करणारा विरोधी पक्षाचा अपरिपक्व नेता आपल्याकडे आहे हे आपले दुर्दैव आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) बोलण्याने आणि कृतीने देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का पोहोचला आहे. त्याने हे काही पहिल्यांदाच केलेले नाही. तो देशविरोधी शक्तींकडून निधी घेतो.
(हेही वाचा – मुलाला आमदार करण्यासाठी Abdul Sattar यांची नवी खेळी!)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community