‘मिशन मौसम’ला सुरुवात; PM Narendra Modi यांच्या हस्ते अनावरण 

102
PM Narendra Modi यांच्या क्लासला "या" दहा आमदारांची दांडी

भारतीय हवामान खात्याचा (Indian Meteorological Department) दीडशे वर्षांचा प्रवास हा देशाच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटचालीचे प्रतीक ठरले आहे, असे गौरवोद्वार मंगळवारी, १४ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हवामान खात्याच्या स्थापना दिनानिमित्त (Establishment Day of Meteorological Department) आयोजित ‘मिशन मोसम’चे (Mission Mausam) अनावरण करताना काढले. (PM Narendra Modi)

वैज्ञानिक संस्थांमधील शोध आणि नवोन्मेष नव्या भारताचे वैशिष्ट्य ठरले आहे. हवामान बदलाचा (Climate change) सामना करण्यासाठी भारत स्मार्ट देश बनावा म्हणून आम्ही ‘मिशन मोसम’ सुरू केले आहे. हवामान खात्याचे अंदाज जेवढे अचूक ठरतील तेवढ्या त्यांच्या सूचनांचे महत्त्व वाढत जाईल. आगामी काळात हवामान खात्याच्या डेटाची मागणीही वाढेल. विविध क्षेत्र, उद्योग, एवढेच नव्हे तर सामान्यांच्या जीवनातही या डेटाची उपयुक्तता वाढणार आहे. भविष्यातील या गरजा ओळखून काम करायचे आहे. भविष्यात भारतीय हवामान विभाग नवी उंची गाठेल. शाश्वत भविष्य व भविष्यातील सज्जतेसंबंधात ‘मिशन मोसम’ हे भारताच्या प्रतिबद्धतेचे प्रतीक आहे, असे मोदी म्हणाले.

(हेही वाचा – संतोष देशमुख हत्या प्रकरण : Walmik Karad ला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी)

भूकंप पूर्वसूचना प्रणाली विकसित व्हावी

भारतापुढे भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचीही आव्हाने असून भूकंपाची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली विकसित करण्याची आवश्यकतेवर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. भूकंपाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित करण्याच्या दिशेने आमचे शास्त्रज्ञ, संशोधक आणि हवामान खात्याने काम करावे. जगाच्या सुरक्षेसाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्लीच्या ‘भारत मंडपम’ येथे आयोजित समारंभात भाग घेताना पंतप्रधान मोदी यांनी हवामान विभागाच्या दीडशेव्या वर्षाच्या निमित्ताने नाण्याचे अनावरण केले तसेच हवामान खात्याच्या व्हिजन- २०४७ चा दस्तावेज जारी केला. यावेळी त्यांनी हवामान खात्याची दीडशे वर्षांची वाटचाल आणि कामगिरीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचीही पाहणी केली.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.