- प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करून शैक्षणिक संधींचे अधिक चांगले आकलन व्हावे यासाठी ‘अटल’ (Assessment, Tests And Learning) उपक्रम राबविण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते बुधवारी या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
महाराष्ट्र राज्य सामाईक परीक्षा कक्ष (सीईटी सेल) मार्फत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी आवश्यक तयारीसाठी मदत करणे हा आहे. या वेळी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई, अधिकारी घनश्याम केदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – Dhananjay Munde पंतप्रधान मोदींच्या बैठकीपासून दूर; परळीत पाठवलं ? राजकीय चर्चांना उधाण)
विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त उपक्रम
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, “या उपक्रमामुळे मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्ट्सद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्याची संधी मिळेल. परीक्षा ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.”
सायकोमेट्रिक टेस्ट्समुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी आणि क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषय निवडता येतील. तसेच, मॉक टेस्ट्समुळे परीक्षेच्या तयारीत प्रगती होईल. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी CET सेलच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community