- प्रतिनिधी
पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय समिती आणि कार्यकारी परिषद यांची पुनर्रचना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. नृपेंद्र मिश्रा पुढील 5 वर्षांसाठी ही जबाबदारी सांभाळतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचीही समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. संस्कृत संशोधक रिझवान कादरी यांची कार्यकारी परिषदेत फेरनियुक्ती करण्यात आली आहे. (PM Museum)
(हेही वाचा – Rahul Gandhi अपरिपक्व विरोधी नेता; BJP ची प्रखर शब्दात टीका)
पंतप्रधान मोदी संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या प्रमुख निर्णय समितीचे अध्यक्ष
सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, कार्यकारिणीच्या विस्तारानंतर पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या प्रमुख निर्णय समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. (PM Museum)
परिषदेत आता २९ ऐवजी ३४ सदस्य असतील. समितीच्या नवीन सदस्यांमध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात योगदान देणारे शिक्षकमित्र चामू कृष्णा यांचा समावेश आहे. के. के. मोहम्मद आणि सुप्रसिद्ध संशोधक रिझवान कादरी, पुरातत्वशास्त्रज्ञ बी. आर. मणी, माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांचाही नव्या यादीत समावेश करण्यात आला आहे. (PM Museum)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community