PM Narendra Modi यांनी महायुतीच्या बैठकीत केला Raj Thackeray यांचा उल्लेख; तर आमदारांना दिला ‘हा’ सल्ला

263

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे बुधवार, 15 जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सकाळी त्यांनी 2 युद्धनौका (battleship) व एका पाणबुडीचे (submarine) राष्ट्रार्पण केले. त्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथे इस्कॉन मंदिराचे (Navi Mumbai ISKCON Temple) ही उद्घाटन केले. तत्पूर्वी, महायुतीच्या आमदारांशी (Mahayuti MLA Meeting) साधलेल्या संवादात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख  करून सत्ताधारी आमदारांना त्यांच्यासारखे अभ्यास दौरे (Raj Thackeray Study Tour) काढण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातचा अभ्यास दौरा केला होता. तसेच दौरे महायुतीच्या आमदारांनी केले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.  (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Dr. Ambedkar यांनी ३ जानेवारी १९४० मध्ये संघ कार्यालयाला दिली होती भेट; पुरावे आले समोर)

पंतप्रधान मोदींनी आमदारांना काय कानमंत्र दिले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महायुतीच्या आमदारांनी लोकांमध्ये जाऊन मिसळले पाहिजे. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांना आपल्या कामातून प्रत्युत्तर द्यावे. आपल्या कामावर लोकांची मते काय आहेत? हे जाणून घ्यावे. इतर राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली झाली असेल तर त्याविषयी अभ्यास दौरे आयोजित करावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातमध्ये अभ्यास दौरा काढला होता. त्यांच्यासारखे दौरे आयोजित करावेत. तसेच समाजाला वेळ देताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. त्यांनाही वेळ द्या. विशेषतः स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. तसेच आपण ठरवलेली कामे निर्धाराने कशी पूर्ण होतील याचेही काटेकोर नियोजन आमदारांनी करायला हवे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

(हेही वाचा – ‘मिशन मौसम’ला सुरुवात; PM Narendra Modi यांच्या हस्ते अनावरण )

दरम्यान, महायुतीतील एकोपा वाढवण्यासाठी आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत त्यांच्या एकमेकांच्या कार्यालयांना भेटी द्या. गावोगावी डब्बा पार्टी आयोजित करा. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपलं सगळ्याकडे लक्ष असले पाहिजे. गुजरातमध्ये ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था सर्व निवडणुकीत भाजपाने सत्ता कशी राखली याचे उदाहरण पंतप्रधानांनी बैठकीत दिले. येणाऱ्या काळात महायुती आमदारांनी तसेच काम करावे असा सल्ला मोदींनी दिला.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.