- प्रतिनिधी
जपानचे भारतातील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी बुधवारी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांची सदिच्छा भेट घेतली. सभापती पदी निवड झाल्याबद्दल कोजी यांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रा. शिंदे (Ram Shinde) यांनी महावाणिज्यदूत कोजी यांचे स्वागत केले. या भेटीत विधिमंडळाचे सचिव (कार्यभार 2) विलास आठवले उपस्थित होते. जपान-भारत मैत्रीचे संबंध अधिक बळकट करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.
(हेही वाचा – ‘मिशन मौसम’ला सुरुवात; PM Narendra Modi यांच्या हस्ते अनावरण )
महावाणिज्यदूत कोजी यांनी महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानचा सहभाग असल्याचा अभिमान व्यक्त केला. विशेषतः मेट्रो उभारणीत जपानचे महत्त्वाचे योगदान असून लवकरच हे प्रकल्प पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले.
प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी २०१६ मध्ये पर्यटन मंत्री म्हणून दिलेल्या जपान भेटींच्या आठवणींना उजाळा दिला. याकोहामा येथील कोयासान विद्यापीठातील भाषणाचा उल्लेख करून त्यांनी जपानच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या बैठकीने महाराष्ट्र आणि जपानमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community