Central Railway वर मुंबई मॅरेथॉन २०२५ साठी २ विशेष लोकल

45
Central Railway वर मुंबई मॅरेथॉन २०२५ साठी २ विशेष लोकल

मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीने मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ मध्ये सहभागी होण्यासाठी विशेष लोकल गाड्या चालविल्या जाणार आहेत. स्पर्धकांना या स्पर्धेत वेळेवर पोहचता यावे यासाठी मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीने रविवार, दि. १९. ०१. २०१५ रोजी २ विशेष उपनगरीय सेवा चालविल्या जाणार आहेत.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी महायुतीच्या बैठकीत केला Raj Thackeray यांचा उल्लेख; तर आमदारांना दिला ‘हा’ सल्ला)

लोकलचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

मुख्य मार्ग : कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष

विशेष ट्रेन कल्याण येथून ०३.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०४.३० वाजता पोहोचेल.

हार्बर लाईन : पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष

विशेष ट्रेन पनवेल येथून ०३.१० वाजता सुटेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०४.३० वाजता पोहोचेल. (Central Railway)

या दोन्ही विशेष गाड्या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील.

स्पर्धक तसेच प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.