२ हजार ९४० Illegal Loudspeakers वर काय कारवाई केली ?; मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला विचारणा

66
Illegal Loudspeakers : २ हजार ९४० बेकायदा भोंग्यांवर सरकारने काय कारवाई केली ?
Illegal Loudspeakers : २ हजार ९४० बेकायदा भोंग्यांवर सरकारने काय कारवाई केली ?

राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर २ हजार ९४० बेकायदा ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत, असा तपशील माहिती अधिकारांतून समोर आला होता. या बेकायदा ध्वनीक्षेपकांवर काय कारवाई केली ? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालक यांना केली. तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. धार्मिक स्थळांवर बेकायदेशीररित्या लावलेल्या भोंग्यांवर कारवाईचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०१६ मध्ये दिले होते; मात्र त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिक संतोष पाचलाग यांनी एका अवमान याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. (Illegal Loudspeakers)

(हेही वाचा – Central Railway वर मुंबई मॅरेथॉन २०२५ साठी २ विशेष लोकल)

राज्यभरातील विविध धार्मिक स्थळांवर २ सहस्र ९४० बेकायदा ध्वनीक्षेपक लावण्यात आल्याचा तपशील माहिती अधिकारांत देण्यात आल्याचेही याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठाने त्याची नोंद घेऊन बेकायदा ध्वनीक्षेपकांवर काय कारवाई केली ? याचा तपशील सादर करण्याचे आदेश गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना दिले.

नवी मुंबईतील मशिदींमध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास ध्वनीक्षेपकांवरून अजान देत असल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. अन्य धार्मिक स्थळांमध्येही नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप याचिकाकर्ते पाचलाग यांनी केला. (Illegal Loudspeakers)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.