‘मुंबईत पेट्रोल- डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करा’ ; प्रदूषणाची Mumbai High Court कडून गंभीर दखल

57
‘मुंबईत पेट्रोल- डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करा’ ; प्रदूषणाची Mumbai High Court कडून गंभीर दखल
‘मुंबईत पेट्रोल- डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करा’ ; प्रदूषणाची Mumbai High Court कडून गंभीर दखल

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) डिझेल आणि पेट्रोल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाची (Pollution) उच्च न्यायालयाने बुधवारी (१५ जाने. ) गंभीर दखल घेतली. प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या व्यवहार्यतेचा निर्णय घेण्यासाठी पॅनल स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत.

सीएनजी किंवा इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करावा
वाहनांमुळे शहरातील हवेची गुणवत्ता खराब होत असून, मुंबईचे रस्ते गुदमरत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला. मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबईतील रस्त्यावरून पेट्रोल-डिझेलवर आधारित वाहने टप्प्याटप्प्याने हटवण्याबाबत काय व्यवहार्य तोडगा काढता येईल, तसेच सीएनजी किंवा इलेक्ट्रिक गाड्या कशा वाढवता येतील याचा विचार करण्यासाठी पंधरा दिवसांत तज्ज्ञ आणि नागरी प्रशासकांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले. (Mumbai High Court)

बेकऱ्यांनी गॅस किंवा इतर हरित इंधनावर बेकरी उत्पादने तयार करावीत
लाकूड आणि कोळसा वापरणाऱ्या शहरातील बेकऱ्यांनी सहा महिन्यांच्या आत गॅस किंवा इतर हरित इंधनावर बेकरी उत्पादने तयार करावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात निरीक्षण नोंदवताना न्यायालयाने म्हटले आहे की, आमच्या मते, अशा बेकरी युनिटस्वर तातडीची आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरून शहरात मोठ्या संख्येने असलेल्या अशा युनिटस्मुळे वायुप्रदूषण होणार नाही, असेही खंडपीठाने नमूद केले. (Mumbai High Court)

ग्रीन एनर्जी वापरण्याच्या अटीचे पालन केल्यानंतर नवीन परवाने मिळणार
कोळसा किंवा लाकडावर चालणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसायांना यापुढे कोणतीही नवीन मान्यता दिली जाणार नाही आणि ग्रीन एनर्जी वापरण्याच्या अटीचे पालन केल्यानंतर नवीन परवाने देण्यात यावेत, असेही खंडपीठाने म्हटले आहे. खंडपीठाने नागरी संस्था आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला बांधकाम साइटवर प्रदूषण निर्देशक स्थापित करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. (Mumbai High Court)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.