अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील जामखेडच्या (Jamkhed Accident) जामवाडीत बोलेरो कार (Bolero car) विहिरीत पडून ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना (Car Accident) घडली आहे. कठडा किंवा पायऱ्या नसलेल्या एका विहिरीत हे वाहन कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेनं जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहित मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Jamkhed Accident)
पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय 29) रामहरी गंगाधर शेळके (वय 35), किशोर मोहन पवार (वय 30) आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (वय 25) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. (Jamkhed Accident)
हेही वाचा-‘मुंबईत पेट्रोल- डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करा’ ; प्रदूषणाची Mumbai High Court कडून गंभीर दखल
बोलेरो या चारचाकी वाहनाने रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर हे प्रवास करत होते. जामवाडी गावात रस्त्याचे काम चालू असल्याने येथील रस्त्यावर खडी टाकलेली होती. त्यामुळे, वाहनचालकास अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याकडला असलेल्या विहिरीत पडले. विहीर अतिशय खोल व विहिरीत पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. त्यामुळे, विहिरीतील पाण्यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला. (Jamkhed Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community