आपण निष्पक्ष लढाई लढत आहेत, हे मनातून काढून टाका; कारण, भाजप आणि संघाने आपल्या देशाच्या प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे आपली लढाई ही केवळ त्यांच्याविरोधात नाही, तर ‘इंडियन स्टेट’विरोधात (Indian State) (भारतीय संघराज्याविरोधातही) आहे, असे चिथावणीखोर उद्गार काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काढले आहेत.
दिल्लीतील कोटला मार्गावरील काँग्रेसच्या (Congress) नव्या मुख्यालयाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी भारतीय राज्य यंत्रणेशीही लढावे लागत असल्याचे मत व्यक्त केले.
भारताला खरे स्वातंत्र्य १९४७ मध्ये नव्हे, तर राममंदिर निर्मितीनंतर मिळाले, असे वक्तव्य सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले होते. त्यानंतर राहुल गांधींनी संरसंघचालकांवरही देशद्रोहाचा ठपका ठेवला. ते म्हणाले, “संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य देशद्रोहासमान आहे. त्यांच्या वक्तव्याने भारतियाचा अवमान झाला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत चुकीच्या गोष्टी घडल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीत पारदर्शकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.”
विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग उत्तरे देत नाही, असे आरोपही गांधी यांनी या वेळी केले.
काँग्रेसचे घृणास्पद सत्य समोर आणले – जे.पी.नड्डा
काँग्रेसचे घृणास्पद सत्य त्यांच्या नेत्याने समोर आणले आहे. भारताला बदनाम करणाऱ्या शहरी नक्षली व परकीय संस्थांशी राहुल व त्यांच्या इको सिस्टिमचे लागेबांधे आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे देशाचे तुकडे पाडणे आणि समाजात फूट पाडण्याच्या दिशेनेच आहे, असे परखड बोल भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी सुनावले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community