बॉलीवूड स्टार सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास एका चोरट्याने सैफ अली खान यांच्या घरात घुसून हल्ला केला, या हल्ल्यात सैफ अली खान आणि त्यांचा एक नोकर जखमी झाले आहे, या घटनेप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने काही माजी नोकर, तसेच सद्यस्थितीत काम करीत असलेल्या नोकरांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. दरम्यान घरफोडी, दरोड्याचे गुन्हे दाखल असलेले अभिलेखावरील गुन्हेगारांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखेने आपल्या खबऱ्यामार्फत हल्लेखोरांचा शोध घेण्यात आले आहे. सैफअली खान (Saif Ali Khan) यांच्यावर हल्ला करणारे चोर हा नोकरांच्या ओळखीचा असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तवली जात आहे.
हेही वाचा-अभिनेता Saif Ali Khan वर चाकूने हल्ला; नेमकं काय घडलं ?
सैफ अली खान (Saif Ali Khan) वांद्रे येथील सतगुरु शरण अपार्टमेंटमध्ये १२व्या मजल्यावर राहण्यास आहे, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सैफ आपल्या कुटुंबासह घरी झोपलेलाअसताना अनोळखी चोरट्याने सैफ अली खानच्या १२ व्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या एका बेडरूम गुरुवारी पहाटे दाखल झाला, सर्वात अगोदर सैफ अलीच्या घरातील मोलकरीण हिने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो तिच्यासोबत वाद घालत असतांन सैफ अली खान (Saif Ali Khan) हा त्या ठिकाणी आला आणि त्याने मध्यस्थी करून चोराला हटकले असता चोरट्याने त्यांच्यावर धारदार वस्तूने हल्ला करण्यात आला. घटनेच्या वेळी अपार्टमेंटमध्ये ४ ते ५ जण उपस्थित होते. खान यांना तातडीने लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. “अभिनेता सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत, अधिक तपास सुरू आहे,” असे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी एका निवेदनात म्हटले आहे. (Saif Ali Khan)
हेही वाचा-‘मुंबईत पेट्रोल- डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने बंद करा’ ; प्रदूषणाची Mumbai High Court कडून गंभीर दखल
सैफचा मुलगा तैमूर अली खान आणि त्याचा केअरटेकर देखील जखमी अभिनेत्याला आणीबाणीच्या खोलीत नेले जात असताना त्याच्यासोबत रुग्णालयात उपस्थित होते. (Saif Ali Khan)
हेही वाचा-आता होणार दूध का दूध, पानी का पानी; FDA ने ताब्यात घेतले दुधाचे १०६२ नमुने
सैफ अली खानला (Saif Ali Khan) ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढल्यानंतर त्याला हॉस्पिटलच्या व्हीआयपी फ्लोअरवरील डीलक्स सूटमध्ये हलवण्यात येईल. अडीच तासांहून अधिक काळ शस्त्रक्रिया चालली आणि तो आता ओटीसह रिकव्हरी रूममध्ये आहे. रुग्णालयातील उच्चपदस्थ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सैफला धारदार शस्त्राने चाकूने वार करून सहा जखमा झाल्या आहेत. त्याच्या मानेला, डाव्या मनगटावर आणि छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीच्या कण्याला अडकला त्यामुळे न्यूरोसर्जिकल हस्तक्षेप आवश्यक होता. बहुतेक जखमा चिरलेल्या जखमा आहेत, तर मणक्याला झालेली जखम थोडी खोल आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉ निरज उत्तमानी यांनीही या निष्कर्षांची पुष्टी केली आणि सांगितले की कॉस्मेटिक आणि न्यूरो सर्जन टीमने शस्त्रक्रिया केली.पोलिसांच्या पथकाने जेव्हा सैफला हॉस्पिटलमध्ये आणले तेव्हा त्याला जाणीव झाली आणि त्याने त्याच्या घरात घुसलेल्या चोरा सोबत झालेल्या भांडणात जखमी झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. (Saif Ali Khan)
https://www.instagram.com/p/DE3t_bHT7aB/?utm_source=ig_web_copy_link
सैफ अली खान यांच्या टीमकडून अधिकृत निवेदन
सैफ अली खान यांच्या निवासस्थानी चोरीचा प्रयत्न झाला. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. आम्ही माध्यमे आणि चाहत्यांना संयम राखण्याची विनंती करतो. हा पोलिसांचा विषय आहे आणि परिस्थितीबाबत आम्ही तुम्हाला अद्ययावत ठेवू.
सैफ अली खान यांचे निवेदन: “चोरीच्या प्रयत्नादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर चाहत्यांनी संयम बाळगावा”
दरम्यान, सैफ अली खान यांच्या पत्नी करिना कपूर यांनी या घटनेच्या काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर करिश्मा कपूर, सोनम कपूर आणि रिया कपूर यांच्यासोबतच्या रात्रीच्या क्षणांचा फोटो शेअर केला होता. चोरीच्या वेळी करिना घरी होत्या की नाही, हे स्पष्ट झालेले नाही, पण त्यांनी बुधवारी रात्री आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवला.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community