मुंबईत अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्य सरकार आणि गृहविभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
“ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत,” असे गायकवाड म्हणाल्या. त्यांनी बीड, परभणी, वांद्रे आणि भायखळा येथे घडलेल्या घटनांचा संदर्भ देत म्हटले की, “गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. घरात घुसून हल्ले होत आहेत, कोयते, चाकू, बंदुका घेऊन लोक फिरत आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे.”
(हेही वाचा – मंत्री आस्थापनावर खासगी किंवा सेवानिवृत्त व्यक्तींची नियुक्ती अमान्य; घ्यावी लागणार CM Fadanvis यांची परवानगी)
पोलीस यंत्रणेवर टीका
गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुंबई पोलिसांवर आणि गृहविभागाच्या कार्यक्षमतेवरही सवाल उपस्थित केला. “मुंबईचे पोलीस जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे मानले जातात. मात्र, अशा घटनांमुळे प्रश्न निर्माण होतो की, पोलीस, आयुक्तालय आणि गृहविभाग खरोखर काम करत आहेत का?” असा सवाल त्यांनी केला.
गुन्हेगारी नियंत्रणाबाबत चिंता
वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यात वाढत्या गुन्हेगारीला सरकार आणि प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले. “गुन्हे खुलेपणाने घडत आहेत, पण त्यावर कुठलाही नियंत्रण दिसत नाही. नागरिकांमध्ये भीती राहिलेली नाही. महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे?” असे त्यांनी विचारले.
(हेही वाचा – Map : भारताच्या नकाशामधून पीओके-अक्साई चीन हटवले; ठाण्यात मुसलमानांचा खोडसाळपणा )
सरकारला आवाहन
गायकवाड यांनी या प्रकरणात गृहविभागाने तत्काळ कारवाई करण्याची आणि कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली. “राज्य सरकारने तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले नाही, तर परिणाम गंभीर होतील,” असा इशाराही त्यांनी दिला.
या घटनेने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर नव्याने वाद निर्माण झाला असून, प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community