टोकियो ऑलिम्पिक : शनिवार भारतीय खेळाडूंसाठी ठरणार पदकांचा दिवस!

१२७ भारतीय खेळाडू पदक जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील.

223

जगातील मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. काही खेळ प्रकारातील स्पर्धा सुरु झाली असताना भारतीय प्रमाणवेळेनुसार ४.३० वाजता ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या उदघाटनाचा थाट नव्हता. भारताचे २० खेळाडू आणि ६ ऑफिशियल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भारताचे ध्वजवाहक भूमिका बजावली.

१४ स्पर्धांमध्ये भारत सहभाग घेणार

ऑलिम्पिकमध्ये शनिवार, २४ जुलै रोजी भारताला अधिकाधिक पदक मिळवण्याची संधी देणारा आहे. भारत १४ स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे. यातील तीन स्पर्धांमध्ये भारताची पदक जिंकण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हे खेळ म्हणजे तिरंदाजी, निशानेबाजी आणि वेटलिफ्टिंग. तिरंदाजीमध्ये भारताने आजवर एकही ऑलिम्पिक पदक जिंकलेलं नाही. तर वेटलिप्टिंगमध्ये सिडनीच्या ऑलिम्पिक स्पर्धेत शेवटचे पदक मिळवले होते. त्यामुळे शनिवारी भारत या तिन्ही खेळात कशी कामगिरी करेल हा पाहावे लागेल.

(हेही वाचा : आता ऑलिम्पिकसाठी जाणा-या खेळाडूंना मुंबईत अशी मिळणार लस)

१२७ भारतीय खेळाडू सहभाग घेणार 

१२७ भारतीय खेळाडू पदक जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावतील. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ११७ खेळाडूंनी पात्रता मिळवली होती. यंदा भारत ऑलिम्पिक सहभागाचे १००वे वर्ष असून यंदा भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा असणार आहे. १८ क्रीडा प्रकारांत भारत सहभाग घेणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला निशानेबाजीमध्ये पदक मिळण्याच्या भरपूर आशा आहेत. शनिवार या स्पर्धेचे इव्हेंटपैकी महिलांची १० मीटर एअर रायफल स्पर्धा खेळवली जाईल. यावेळी भारताकडून अपूर्वी चंदेला आणि इलावेनिल वालारिवान या मैदानात उतरतील. या दोघींचा आतापर्यंतचा खेळ पाहता यांनी उत्तम कामगिरी केल्यास त्या नक्कीच पदक जिंकू शकतात. महिलांव्यतीरिक्त पुरुषांचा विचार करता पुरुष वर्गाच्या १० मीटर एयर पिस्तल प्रकारात सौरभ चौधरी खेळणार आहे. या युवा निशानेबाजाचा आतापर्यंतचा खेळ पाहता तो भारताकडून पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. सौरभसह अभिषेक वर्माही या स्पर्धेत भारताकडून मैदानात उतरेल.

वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईवर सर्व मदार

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानू ही भारताची एकमेव वेटलिफ्टर असल्याने भारताच्या सर्व आशा या तिच्यावरच आहेत. मीराबाई शनिवारी होणाऱ्या वेटलिफ्टिंगच्या स्पर्धेत सहभाग घेईल. भारतीय इतिहासातील एक सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून मीराबाईकडे पाहिले जाते. शुक्रवार ती २१० किलोग्राम वर्गासाठी भारताकडून सिलेक्ट झाली आहे.

तिरंदाजीमध्ये दीपिकासह अतनुदास तयार

तिरंदाजीमध्ये यंदा नवरा-बायको असणारे अतनु दास आणि दीपिका कुमारी हे शनिवार मिश्र संघाच्या स्पर्धेत सहभागी होतील. हे दोघेही स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार असून काही दिवसांपूर्वीच तिरंदाजी विश्व चषकात दोघांनी पदक मिळवले होते. दीपिका जगातील नंबर-1 ची तिरंदाज म्हणून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.