पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून बुधवार, १५ जानेवारी या दिवशी दुपारी वंदे भारत स्लीपरच्या (Vande Bharat Sleeper) प्रोटोटाइप ट्रेनची ट्रायल रन घेण्यात आली. चाचणीदरम्यान ट्रेन १३० किमी प्रतितास वेगाने चालविण्यात आली. शेवटची ही ट्रायल रन (train trial run) यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने रेल्वे सेफ्टी कमिशनर (Commissioner of Railway Safety) (सीआरएस) यांच्याकडून सर्टिफिकेट मिळण्यास मदत होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
(हेही वाचा – राज्यातील ITI महाविद्यालयांना मिळणार महापुरुषांची नावे)
वंदे भारत स्लीपर ट्रेन ही भारतीय रेल्वेने सादर केलेली एक अत्याधुनिक आणि आरामदायी ट्रेन आहे, जी लांब पल्ल्याच्या प्रवासाला सोयीस्कर आणि आरामदायी बनवण्याच्या उद्देशाने लवकरच सुरू होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन राजधानी एक्सप्रेस (Rajdhani Express) आणि तेजस एक्सप्रेस गाड्यांपेक्षा खूप चांगल्या आणि शताब्दी एक्सप्रेस (Shatabdi Express) गाड्यांपेक्षा वेगवान मानल्या जातात. ही ट्रेन लांब पल्ल्यासाठी तयार करण्यात आली आहे.
अहमदाबाद ते मुंबईदरम्यान या वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली. या ट्रेनची चाचणी राजस्थानच्या कोटामध्येदेखील घेण्यात आली होती. वंदे भारत स्लीपरमध्ये १६ डबे आहेत. त्यापैकी ११ डब्बे एसी ३ टायर कोच, ४ डब्बे एसी २ टायर कोच आणि १ फर्स्ट एसी कोचचा समावेश आहे. या ट्रेनमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधाही देण्यात आल्या आहेत. या ट्रेनमध्ये आरामदायी बर्थ, स्वच्छ आणि आधुनिक टॉयलेट्स, हाय स्पीड वाय-फाय, रीडिंग लाइट्स आणि हाय स्पीड मोबाईल चार्जिंग पॉइंट्स यांसारख्या सुविधा असतील.
या ट्रेनच्या कोचमध्ये नियमित प्रवाशांसोबतच अंध प्रवाशांसाठीदेखील विशेष सोय केली असून, सीट नंबर आणि सर्व सूचना ब्रेल लिपीमध्येदेखील नमूद करण्यात आल्या आहेत. (Vande Bharat Sleeper)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community