१० देशांचे २१ सदस्यीय आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाने महाकुंभपर्वाला भेट दिली आहे. त्यांंनी पवित्र त्रिवेणी संगमात अमृत स्नानही केले. याचे आयोजन केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. हे शिष्टमंडळ १५ जानेवारीला प्रयागराजला पोचले असून त्यांची निवासव्यवस्था अरैल क्षेत्रातील टेंट सिटी येथे करण्यात आली आहे. सायंकाळी या शिष्टमंडळाने कुंभक्षेत्राची पहाणी केली. (Mahakumbh 2025)
(हेही वाचा – सैफ अली खानवरील हल्ल्याच्या आडून Sanjay Raut यांची पंतप्रधानांवर टीका)
१६ जानेवारीला सकाळी सर्व सदस्यांनी संगमात स्नान केले. या शिष्टमंडळात फिजी, फिनलँड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि संयुक्त अरब अरित या १० देशाच्या सदस्यांचा समावेश आहे.
कुंभपर्वाच्या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य स्टेज, गंगा पंडाल येथे देशभरातील नामवंत कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत. उद्घाटनाच्या दिवशी शंकर महादेवन यांच्या विशेष सादरीकरणाचा समावेश आहे. 16 जानेवारीपासून यमुना आणि सरस्वती पंडालमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतील, तर त्रिवेणी पंडालमध्ये 21 जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळेल.
16 जानेवारी या दिवशी काशीच्या संस्कृत शाळांमधील विद्यार्थी यमुना पंडालमध्ये मंगलाचरणाद्वारे आपली भक्ती सादर करतील. सरस्वती पंडालमध्ये पारंपारिक कला प्रदर्शित केल्या जातील, तर पद्मश्री रामदयाल शर्मा आणि त्यांची 30 सदस्यीय टीम भगवान कृष्णाच्या सुदामाशी असलेल्या मैत्रीची कथा सादर करेल. (Mahakumbh 2025)
हेही पहा –