- ऋजुता लुकतुके
प्रत्येक आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेपूर्वी महत्त्वाचं असतं ते संघांच्या कर्णधारांचं फोटोशूट आणि उद्घाटनाचा सोहळा. हे दोनही अधिकृत कार्यक्रम आहेत. चॅम्पियन्स करंडकासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही, हे आता ठरलंय. भारताचे सामनेही दुबईला हलवण्यात आले आहेत. पण, उद्धाटनाचा सोहळा आणि कर्णधारांचं एकत्र फोटोशूट या कार्यक्रमांविषयी अजून अनिश्चितताच आहे. हे दोन्ही कार्यक्रम सध्या तरी पाकिस्तानलाच होणार आहेत आणि त्यासाठी व्हिसा मिळून किमान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार का यावर आता चर्चा सुरू झाली आहे. (Champions Trophy 2025)
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने याविषयी बीसीसीआयकडून स्पष्टता मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. १९ फेब्रुवारीला कराचीत या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण, त्यापूर्वी सहभागी होणाऱ्या ८ संघांच्या कर्णधारांचं एकत्रित फोटोशूट होणार आहे. तसंच कर्णधारांची स्वतंत्र पत्रकार परिषदही होणार आहे. हे कार्यक्रम सध्याच्या वेळापत्रकानुसार, पाकिस्तानातच आहेत. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – शहर फेरीवालेमुक्त करण्यात मुंबई महापालिका अपयशी; Bombay High Court चे ताशेरे)
‘पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आठही संघांच्या कर्णधारांचा व्हिसा त्यांना तत्परतेनं मिळावा अशी विनंती पाकिस्तान सरकारला केली आहे. अर्थातच, यात रोहित शर्मा किंवा भारताचा कुठलाही कर्णधार आला. पण, त्यांनी अजून काही कळवलेलं नाही. उद्घाटनाचा कार्यक्रम, फोटोशूटहे यजमान देशातच होणार असा प्रोटोकॉल आहे. तो बदलता येणार नाही,’ असं पीसीबीमधील सूत्रांनी म्हटल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)
तर भारतातून पाकिस्तानला जायचं असल्यास त्या व्यक्तीला केंद्र सरकारची परवानगी लागते. ती परवानगी रोहित शर्मा किंवा भारतीय कर्णधाराला मिळेल का, अख्खा संघ पाकिस्तानला उद्गाटन सोहळ्यासाठी जाणार का, हे प्रश्नही आता नव्याने वर आले आहेत. अलीकडेच आयसीसीच्या ताफ्यात असलेले ३ भारतीय वंशाचे आणि भारतीय पासपोर्ट असलेले अधिकारी स्टेडिअमची पाहणी करण्यासाठी पाकिस्तानला गेले होते. तिघांनाही तातडीने पाकिस्तानी व्हिसा मिळाला. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community