Mahakumbh 2025 : महाकुंभमुळे विमान प्रवास महागला ; मुंबई- प्रयागराज विमानाचे तिकीट दर जाणुन घ्या …

90
Mahakumbh 2025 : महाकुंभमुळे विमान प्रवास महागला ; मुंबई- प्रयागराज विमानाचे तिकीट दर जाणुन घ्या ...
Mahakumbh 2025 : महाकुंभमुळे विमान प्रवास महागला ; मुंबई- प्रयागराज विमानाचे तिकीट दर जाणुन घ्या ...

१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचे (Mahakumbh 2025) आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या (Mumbai-Prayagraj Flight ) मागणीत मोठी वाढ झाली आहे. ट्रॅव्हल पोर्टल ixigo च्या माहितीनुसार, दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या तिकीट दरात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील एकेरी भाडे आता सरासरी ५,७४८ रुपये झाले आहे. (Mahakumbh 2025)

हेही वाचा-Bangladeshi Infiltrators : बांगलादेशातून हेरगिरीसाठी भारतात तृतीयपंथीयांची घुसखोरी

मुंबई-प्रयागराज विमानांच्या तिकीट दरांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील विमान भाडे आता सरासरी ६,३८१ रुपये झाले आहे. प्रयागराजला जाण्यासाठी अनेक भाविक विमान प्रवासाला पसंती देत असल्याने विमान तिकिटांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. (Mahakumbh 2025)

हेही वाचा-ISRO SpaDeX Mission : इस्रोची स्पाडेक्स मोहीम यशस्वीरित्या पूर्ण ; असे करणारा भारत ठरला चौथा देश

मध्य प्रदेशातील भोपाळ (Bhopal) ते प्रयागराज मार्गावरील विमानांच्या भाड्यात सर्वाधिक ४९८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी भोपाळहून प्रयागराजला जाण्यासाठी २,९७७ रुपये इतके विमान भाडे होते. ते आता १७,७९६ रुपये इतके झाले आहे. बेंगळुरू (Bangalore) ते प्रयागराज आणि अहमदाबाद (Ahmedabad) ते प्रयागराज यासारख्या इतर मार्गांवरही अनुक्रमे ८९ टक्के आणि ४१ टक्के भाडेवाढ झाली आहे. (Mahakumbh 2025)

हेही वाचा-Saif Ali Khan वरील हल्ल्याचे काँग्रेसकडून राजकारण सुरु; कायदा-सुव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये १६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, लखनौ आणि वाराणसीसारख्या जवळच्या शहरांतून प्रयागराजला जाणाऱ्या विमानांची तिकिटेही अनुक्रमे ४२ टक्के आणि १२७ टक्क्यांनी वाढली आहेत. यावरून महाकुंभमेळ्याकडे भाविक मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचे दिसते. (Mahakumbh 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.