Election Commission कडून राजकीय पक्षांसाठी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’बाबत मार्गदर्शक सूचना जारी

43
Election Commission कडून राजकीय पक्षांसाठी 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बाबत मार्गदर्शक सूचना जारी
Election Commission कडून राजकीय पक्षांसाठी 'कृत्रिम बुद्धीमत्ते'बाबत मार्गदर्शक सूचना जारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाने (Election Commission) ‘एआय’बाबत (AI) महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये राजकीय पक्षांना प्रचारात जबाबदारी आणि पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करण्यास सांगितले आहे. याबाबत आयोगाने दि. १६ जानेवारी रोजी राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सल्ला दिला. आयोगाने म्हटले की, राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी एआय वापरून प्रसिद्ध केलेली सामग्री योग्यरित्या उघड करावी.

( हेही वाचा : Bangladeshi Infiltrators : बांगलादेशातून हेरगिरीसाठी भारतात तृतीयपंथीयांची घुसखोरी

निवडणुक आयोगाने (Election Commission) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणत्याही राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी राजकीय प्रचारासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (एआय) तयार केलेला कोणाताही फोटो, व्हिडिओ किंवा इतर साहित्य वापरत असेल तर त्याचा स्रोत उघड करणे आवश्यक आहे, असे आयोगाने सांगितले.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी निवडणुकीत एआयच्या गैरवापराबद्दल सतत चिंता व्यक्त केली आहे. दि. ७ जानेवारीला पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Assembly Elections) घोषणा केल्यानंतर त्यांनी म्हटले की, चुकीची माहिती पसरवण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाला सतर्क राहावे लागेल. तसेच अशी माहिती थांबवण्यासाठी जलद गतीने कारवाई करावी लागणार असल्याचे असे त्यांनी सांगितले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही आयोगाने अशाच प्रकारे सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Election Commission)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.