Border-Gavaskar Review : क्रिकेटपटूंच्या मनमानीवर बीसीसीआय लावणार चाप, ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर पहिली कारवाई

Border-Gavaskar Review : गंभीरच्या मॅनेजरलाही संघाबरोबर राहता येणार नाही. 

46
Border-Gavaskar Review : क्रिकेटपटूंच्या मनमानीवर बीसीसीआय लावणार चाप, ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर पहिली कारवाई
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर मालिकेतील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने खेळांडूच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी काही नियम नक्की केले आहेत. तसंच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवरही महत्त्वाचे निर्बंध लादले आहेत. गंभीरचा खाजगी व्यवस्थापक या दौऱ्यावर त्याच्याबरोबर होता. आणि तो संघाबरोबर बसमधून प्रवासही करत होता. तसंच संघाच्या ड्रेसिंग रुममध्येही तो होता. यावर बीसीसीआयने बैठकीत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसंच खेळाडूंनाही आपली पत्नी तसंच इतर कुटुंबीयांना जास्तीत जास्त १५ दिवस दौऱ्यावर बरोबर घेऊन जाता येणार आहे.

रविवारी बीसीसीयाचे पदाधिकारी, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार रोहीत शर्मा यांच्यात आढावा बैठक पार पडली, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा व्यवस्थापक आता संघासोबत प्रवास करू शकणार नाही. त्याला संघाच्या बसमध्ये बसण्याची परवानगीही दिली जाणार नाही. गंभीर जेव्हा मुख्य प्रशिक्षक झाला तेव्हा बीसीसीआयने त्यांच्या सर्व गोष्टी मान्य केल्या, परंतु त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाची कामगिरी खराब राहिली आहे. हे पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्यांदाच त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. (Border-Gavaskar Review)

(हेही वाचा – Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम; १९ जानेवारीपासून लागू होणार शांतता करार)

बीसीसीआयने गौतम गंभीरचा खाजगी व्यवस्थापक गौरव अरोरा याच्यावर कठोर कारवाई केली आहे. त्याला आता गंभीरसोबत हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर ते एकत्र आले तर त्यांना स्वतःसाठी वेगळे हॉटेल बुक करावे लागेल आणि बीसीसीआय त्याचा खर्च उचलणार नाही. याशिवाय त्याला संघाच्या बसमध्ये बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. गौरव अरोरा आता ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकणार नाही.

याशिवाय गौतम गंभीरच्या आणखी दोन जवळच्या सहकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. बीसीसीआय फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टेन ड्युसकाटे यांच्या कामावरही खूश नाही. गंभीरच्या विनंतीवरून हे दोघेही टीम इंडियाशी जोडले गेले होते, पण आता त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Border-Gavaskar Review)

(हेही वाचा – Kho Kho World Cup : खो-खो विश्वचषकात भारताचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत; भूतान, नेपाळ, केनियाचे प्रभावी विजय)

बीसीसीआयचे खेळाडू आणि कुटुंबांसाठी नवे नियम
  • जर स्पर्धा किंवा मालिका ४५ दिवस अथवा त्यापेक्षा अधिक दिवसांची असेल तर खेळाडूंचे कुटुंबीय फक्त १४ दिवस त्यांच्यासह राहू शकतात.
  • जर स्पर्धा किंवा मालिका ४५ दिवसांपेक्षा कमी दिवसांची असेल तर कुटुंबीय फक्त ७ दिवस सोबत राहू शकतात.
  • खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासह संपूर्ण स्पर्धेसाठी सोबत राहू शकत नाही.
  • खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्यासह फक्त २ आठवडे राहू शकतात.
  • मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा पर्सनल मॅनेजरला बस किंवा व्हीआयपी बॉक्समध्ये येण्याची परवानगी नसेल. पर्सनल मॅनेजरलाही वेगळ्या हॉटेलमध्ये राहावे लागले.
  • जर खेळाडूंच्या सामनाचं वजन १५० किलोपेक्षा अधिक असेल तर बीसीसीआय खेळाडूंच्या सामनासाठी अधिक पैसे देणार नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.