दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Assembly Elections) मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी दि. ७ जानेवारी रोजी घोषणा केली. त्यानंतर लगेच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) (Ajit Pawar) पक्षाने दिल्ली विधानसभेत ११ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. अशातच दि. १६ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
( हेही वाचा : Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकाच्या फोटोशूटसाठी रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार का?)
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) (Nationalist Congress Party-AP) स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये २० नावांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , पार्थ पवार (Parth Pawar) , सुनील तटकरे,प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश अदिक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर यांच्यासह अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी दि. १७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून २० जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. (Ajit Pawar)
हेही पाहा :