देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई; Devendra Fadnavis यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

32
देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई; Devendra Fadnavis यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई; Devendra Fadnavis यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

मुंबईमध्ये अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) घरात घुसून हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) गटाचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. त्यावर आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : Mahakumbh 2025 : महाकुंभमुळे विमान प्रवास महागला ; मुंबई- प्रयागराज विमानाचे तिकीट दर जाणुन घ्या …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्याची संपूर्ण माहिती पोलिसांनी आपल्याला दिली आहे. या हल्लामागे काय कारणे असावीत, हे सुद्धा पोलिसांनी सांगितलेले आहे. पण या घटनेमुळे मुंबई असुरक्षित असल्याचे सांगणे चुकीचे आहे. यामुळे मुंबईची प्रतिमा देखील खराब होत आहे. पण मुंबई (Mumbai) अत्याधिक सुरक्षित राहावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. तसेच त्यांनी देशातील मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे, असे ही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. (Devendra Fadnavis)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.