- खास प्रतिनिधी
लक्षात असू द्या. ३० जानेवारी २०२५ (30 January) या दिवशी सकाळी ११ वाजता तुम्हाला मौन पाळायचे आहे. तुम्हीच नाही, तर शालेय शिक्षक, विद्यार्थी, सरकारी अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिक मौन पाळातील.
हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर
राज्य शासनाने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते.
(हेही वाचा – Delhi Assembly Election : जो ‘येथे’ जिंकणार, तोच सिंहासनावर बसणार; आप, भाजपा, काँग्रेसने आखली खास रनणिती)
इशारा भोंगा वाजेल
त्यानुसार यावर्षीही गुरुवार, ३० जानेवारी, २०२५ (30 January) या सकाळी ठिक ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा. ३० जानेवारीला सकाळी ११.०० वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठिक १०.५९ पासून ११.०० वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्यात येईल. सदर इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना/शैक्षणिक संस्था, विद्यापीठे यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे.
आदरांजली गंभीर व योग्य आदराने द्या
सकाळी ठिक ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा ११.०३ मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल. जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निदेश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना या परिपत्रकात नमूद करण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community