Liquor Scam चे पैसे माजी मंत्र्याने वापरले काँग्रेस भवनाच्या बांधकामासाठी; दरमहा मिळायचे दोन कोटींचे कमीशन

85
Liquor Scam चे पैसे माजी मंत्र्याने वापरले काँग्रेस भवनाच्या बांधकामासाठी; दरमहा मिळायचे दोन कोटींचे कमीशन
Liquor Scam चे पैसे माजी मंत्र्याने वापरले काँग्रेस भवनाच्या बांधकामासाठी; दरमहा मिळायचे दोन कोटींचे कमीशन

रायपूरमधील मद्य घोटाळ्याच्या (Liquor Scam) प्रकरणात माजी मंत्री कवासी लखमा (Kawasi Lakhma) यांना अटक झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. सात दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत ईडी कवासी लखमा यांच्याकडून काही गुप्त माहिती उघड करू शकते. ज्यामुळे लखमा यांच्यासह काँग्रेस नेत्यांच्या अडचणी वाढतील.

( हेही वाचा : India Coaching Staff : भारतीय संघाला मिळणार फलंदाजीचा प्रशिक्षक? यो-यो टेस्टही परतणार

ईडीचे वकील सौरभ पांडे (Saurabh Pandey) म्हणाले की, लखमा (Kawasi Lakhma) यांनी तपासात सहकार्य केले नाही. यासोबतच पुरावे नष्ट करण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आम्ही न्यायालयाकडे १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली होती पण न्यायालयाने ७ दिवसांची कोठडी दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी रोजी होईल, असेही पांडे म्हणाले. (Liquor Scam)

मद्य घोटाळ्याची (Liquor Scam) चौकशी सुरु आहे. त्यात, अरविंद सिंग यांनी सांगितले की, मद्य तस्करी करणाऱ्यांकडून कवासी लखमा (Kawasi Lakhma) यांना दरमहा ५० लाख रुपये दिले जात होते. तसेच अरुणपती त्रिपाठी आपल्या साक्षीत म्हणाले की, ५ लाख रुपयांव्यतिरिक्त, दरमहा मंत्र्यांना १.५ कोटी रुपये अधिक दिले जात होते. अशाप्रकारे, दरमहा मंत्र्यांना मद्य तस्करीकडून २ कोटी रुपये मिळत असत. एवढेच नाही तर हा घोटाळा सुमारे ३६ महिने सुरू राहिला आणि त्यानुसार मंत्र्यांना ७२ कोटी रुपये मिळाले आहेत.(Liquor Scam)

तपासात असे दिसून आले आहे की, उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी इक्बाल खान (Iqbal Khan) आणि जैन देवांगन यांनी देखील पुष्टी केली आहे की ते पैसे व्यवस्थित करत होते आणि ते कवासी लखमा (Kawasi Lakhma) पाठवत होते. सुकमामध्ये या पैशाचा बॅगा कलेक्ट करत. जगन्नाथ साहू आणि त्यांचा मुलगा हरीश लखमा यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली तेव्हा डिजिटल पुरावे सापडले. जेव्हा या डिजिटल पुराव्यांची तपासणी करण्यात आली तेव्हा कवासी लखमा यांनी हे पैसे सुकमा येथील मुलाचे घर आणि काँग्रेस भवन बांधण्यासाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले. (Liquor Scam)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.