Zero Pendency and Daily Disposal उपक्रमाने उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित प्रकरणे निकाली

29
Zero Pendency and Daily Disposal उपक्रमाने उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित प्रकरणे निकाली
  • प्रतिनिधी

उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईलींची संख्या कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल’ (Zero Pendency and Daily Disposal) उपक्रमामुळे प्रशासन लोकाभिमुख व गतिमान झाले आहे. या मोहिमेद्वारे आतापर्यंत ४,४७० प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली असून उर्वरित प्रकरणे ३१ जानेवारी २०२५ पर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, ते स्वतः प्रलंबित फाईलींचा आढावा घेत आहेत. मंत्री पाटील यांनी ३१ जानेवारीपर्यंत विभागात झिरो पेंडन्सीचे (Zero Pendency and Daily Disposal) उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, १ फेब्रुवारीपासून ते अचानक कार्यालयांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : सक्तीच्या विश्रांतीच्या बातमीला बुमराह म्हणाला, ‘फेक न्यूज’)

उपक्रमाअंतर्गत (Zero Pendency and Daily Disposal) प्रलंबित प्रकरणांचे वर्गीकरण करून तातडीने निपटारा करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली. यामध्ये अनुकंपा प्रकरणे, वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह निधी, अर्जित रजा रोखीकरण, वेतननिश्चिती आणि सेवानिवृत्ती प्रकरणांचा समावेश होता. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा कार्यालये कार्यरत ठेवून प्रकरणे निकाली काढण्यात आली.

तंत्र शिक्षण संचालनालयातील १,४९० पैकी १,३५३ प्रकरणे आणि उच्च शिक्षण संचालनालयातील ४,१८३ पैकी ३,११७ प्रकरणे निकाली काढली गेली आहेत. विभागातील एकूण ४,४७० प्रकरणे निकाली निघाली असून, उर्वरित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी नियोजन सुरू आहे. या उपक्रमामुळे (Zero Pendency and Daily Disposal) विभागातील कामकाज अधिक गतिमान होण्यासह लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.