Rani Baug : राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात गुजरातचा पांढरा सिंह आणण्यासाठी आयुक्तांनी घेतला पुढाकार

74
Rani Baug : राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात गुजरातचा पांढरा सिंह आणण्यासाठी आयुक्तांनी घेतला पुढाकार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणीबागेत (Rani Baug) गुजरातमधील पांढरा सिंह येणार अशाप्रकारची चर्चा आपण मागील सहा ते सात वर्षांपासून ऐकत आलो असलो तरी प्रत्यक्षात हा सिंह येण्याचा काही मार्ग खुला होत नाही. अखेर महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी यासाठी पुढाकार घेतला असून गुजरात आणि महाराष्ट्रातील दोन्ही सरकारच्या मदतीने आता हा सिंह मुंबईत आणला जाणार आहे.त्यामुळे आजवर हा सिंह येण्याच्या मार्गावरील ‘झेब्रा’चा जो काही अडसर आहे, ते गतिरोधकच आता दोन्ही राज्यांच्या सरकारमुळे दूर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – Banners : अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सबाबत जनजागृतीसाठी पहिली बैठक एल विभागात पार पडली)

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय अर्थांत राणीबागेत (Rani Baug) मुंबईसह देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. ऑगस्ट २०१७मध्ये राणीबागेत पेंग्विन आल्यापासून पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असून मागील काही वर्षांपासून विविध प्राणी आणि पक्षी आणण्यात येत असून काही महिन्यांपूर्वी बिबळ्या आणि कोल्ह्याची नर मादी जोडी आणण्यात आली आहे. तर राणीबागेतील (Rani Baug) सिंहांचा पिंजरा बनून तयार झाला असला तरी मागील सन २०१९पासून गुजरातमधून सिंह येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

(हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राचे मोठे गिफ्ट; 8th Central Pay Commission च्या स्थापनेला मंजुरी)

गुजरामधील प्राणिसंग्रहालयातील सिंहाची जोडी प्राप्त करण्यासाठी पत्रव्यवहार सुरु असून या प्राणिसंग्रहालयाने या बदल्यात झेंब्राची मागणी केली होती, जी मागणी राणीबाग (Rani Baug) प्राणिसंग्रहालय पूर्ण शकत नाही. परंतु हा सिंह मार्च पर्यंत येईल असे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात ही सर्व प्रक्रिया प करण्यासाठी मे उजाडला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आजवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक यांच्या माध्यमातून सुरु होता, परंतु आता महापालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी यासाठी पुढाकार घेतला असून गुजरात आणि महाराष्ट्र राज्यात भाजपाचे सरकार असल्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मदतीने गुजरातमधील पांढरा सिंह मुंबईतील प्राणिसंग्रहालयात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.