Dharavi तील पहिल्या ‘संसाधन केंद्रा’चे लोकार्पण; धारावीकरांसाठी कौशल्य आणि रोजगार संधींचा नवा अध्याय

51
Dharavi तील पहिल्या 'संसाधन केंद्रा'चे लोकार्पण; धारावीकरांसाठी कौशल्य आणि रोजगार संधींचा नवा अध्याय
  • प्रतिनिधी

धारावीकरांच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी देण्यासाठी धारावी सोशल मिशन (डीएसएम) च्या वतीने पहिल्या ‘संसाधन केंद्रा’चे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमाद्वारे धारावीतील (Dharavi) रहिवाशांना कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

उज्ज्वल भविष्यासाठी धोरणात्मक वाटचाल :

धारावीच्या (Dharavi) रहिवाशांसाठी १०,००० कौशल्य विकास संधी आणि ३,००० रोजगार संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट डीएसएमने २०२५ पर्यंत ठेवले आहे. याशिवाय, आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याचा मानसही व्यक्त केला आहे.

(हेही वाचा – Rani Baug : राणीबागेतील प्राणिसंग्रहालयात गुजरातचा पांढरा सिंह आणण्यासाठी आयुक्तांनी घेतला पुढाकार)

धारावीतील ‘मिनी इंडिया’मध्ये नवा अध्याय :

धारावीतील (Dharavi) जिद्दी युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी संसाधन केंद्राच्या माध्यमातून शिक्षण आणि रोजगाराच्या दिशेने पावले उचलली जाणार आहेत. “धारावीतील तरुणांमध्ये जबरदस्त क्षमता आहे. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे डीएसएमचे प्रवक्ते म्हणाले.

विविध उपक्रमांमधून यशस्वी वाटचाल :

डीएसएमने गेल्या वर्षभरात विविध कार्यक्रमांद्वारे धारावीतील रहिवाशांशी जवळीक साधली आहे. ‘युवा संवाद’, कौशल्य विकास कार्यक्रम, रोजगार मेळावे, आणि आरोग्य तपासणी शिबिरे यांसारख्या उपक्रमांद्वारे हजारो धारावीकरांना फायदा झाला.

(हेही वाचा – Banners : अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्सबाबत जनजागृतीसाठी पहिली बैठक एल विभागात पार पडली)

संसाधन केंद्राचे उद्दिष्ट :

धारावीतील (Dharavi) युवकांना रोजगारक्षम बनवणे, लघुउद्योग आणि बचत गटांना डिजिटल माध्यमातून सक्षम करणे, आणि धारावीच्या संस्कृतीचे संरक्षण करत त्यांच्यासाठी एक आत्मसन्मानपूर्ण भविष्यातील वाटचाल सुनिश्चित करणे हे डीएसएमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

धारावीकरांसाठी नवीन संधींचा प्रकाश :

“धारावीतील (Dharavi) रहिवाशांना आर्थिक स्थैर्य, आरोग्यसेवा, आणि उत्तम शिक्षण मिळवून देण्यासाठी संसाधन केंद्राचा वापर केला जाईल,” असे डीएसएमचे प्रवक्ते म्हणाले. हा उपक्रम धारावीकरांच्या जीवनात नवा अध्याय लिहीणारा ठरेल, अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.