Bijapur मध्ये सुरक्षा जवानांनी १२ नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान

31
Bijapur मध्ये सुरक्षा जवानांनी १२ नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
Bijapur मध्ये सुरक्षा जवानांनी १२ नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान

बिजापूर (Bijapur) जिल्ह्यातील उसूर ब्लॉकच्या पुजारी कांकेर आणि मरुडबाकाच्या जंगलात आज, गुरुवारी सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी १२ नक्षलवाद्यांना (Naxalite) कंठस्नान घातले.

( हेही वाचा : Zero Pendency and Daily Disposal उपक्रमाने उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित प्रकरणे निकाली

विजापूर आणि तेलंगणाच्या (Telangana) सीमेवर असलेल्या ३ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू आहे. यादरम्यान सकाळी ९ वाजेच्या सुमारा दक्षिण विजापूरच्या (Vijayapura) जंगलात गोळीबार सुरू झाला. यामध्ये आतापर्यंत १२ नक्षलवादी ठार झाले आहे. या परिसरात चकमक आणि शोध मोहिम सुरू असून जंगलातून जवान परतल्यावरच मृतकांचा नेमका आकडा कळू शकेल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांच्या नेतृत्त्वात सुमारे एक हजार जवान हे ऑपरेशन राबवत आहेत. (Bijapur)

सुकमा, दंतेवाडा डीआरजी व्यतिरिक्त सीआरपीएफचे जवानही या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत. जवानांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. त्यामुळे घाबरलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर जवानांनी तत्काळ पोजिशन घेत प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. या कारवाईत 3 जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) कर्मचारी, सीआरपीएफ च्या एलिट जंगल वॉरफेअर युनिटच्या (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन) ५ बटालियन आणि सीआरपीएफची २२९ वी बटालियन या ऑपरेशनमध्ये सहभागी असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Bijapur)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.