Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार ? तारिख ठरली …

91
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार ? तारिख ठरली ...
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार ? तारिख ठरली ...

लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केला होता. नवीन वर्षाचा पहिला जानेवारी महिन्याचा डीबीटी लाभ द्यायला सुरुवात 26 जानेवारीच्या अगोदरपासून सुरु करणार आहोत, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी यांनी दिली. (Ladki Bahin Yojana)

2100 रुपयांबाबत नव्या अर्थसंकल्पात विचार केला जाईल
जानेवारी महिन्याचा लाभ 26 जानेवारीच्या अगोदरपासून वितरणाला सुरुवात होईल. तीन ते चार दिवसात लाडक्या बहिणींना तो प्राप्त होईल. जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात 26 जानेवारीच्या आत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार करणार आहोत. 2100 रुपयांबाबत नव्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतरच्या काळात विचार केला जाईल. जास्तीत जास्त महिलांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचवणं हा आमचा प्रयत्न आहे. असं आदिती तटकरे म्हणाल्या. (Ladki Bahin Yojana)

2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ
अर्थ विभागाकडून 3690 कोटी रुपयांचा निधी जानेवारी महिन्याच्या वितरणासाठी मिळालेला आहे. फेब्रुवारीसंदर्भात देखील नियोजन सुरु आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यात कुठेही खंड पडणार नाही यासाठी आम्ही विभाग म्हणून काम करत आहोत. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला आहे, असं आदिती तटकरे म्हणाल्या. (Ladki Bahin Yojana)

काही महिलांनी स्वत:हून लाभ सोडला
काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. काही महिलांनी स्वत:हून लाभ सोडलेला आहे. दुबार नाव नोंदणी, दुसऱ्या योजनांसह या योजनेचा लाभ घेतलेला आहे, तसे असतील किंवा काही महिलांचं उत्पन्न वाढलंय असं लक्षात आल्यानंतर ज्यांनी नावं काढून घेतली अशी नावं कमी होतील. या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांचा आकडा कायम राहील, त्यात थोडाफार बदल झाला तर एक लाखानं संख्या कमी होईल, असं आदिती तटकरेंनी म्हटलं. (Ladki Bahin Yojana)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.