Skoda Octavia RS iV : स्कोडा ऑक्टेविया गाडीला मिळालंय फेसलिफ्ट 

Skoda Octavia RS iV : गाडीच्या इन्फोटेनमेंट प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रोग्रामही आहे

39
Skoda Octavia RS iV : स्कोडा ऑक्टेविया गाडीला मिळालंय फेसलिफ्ट 
Skoda Octavia RS iV : स्कोडा ऑक्टेविया गाडीला मिळालंय फेसलिफ्ट 
  • ऋजुता लुकतुके

स्कोडा कंपनीच्या ऑक्टेविया या लोकप्रिय सेडान कारमध्ये कंपनीने काही बदल करून फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणलं आहे. ऑक्टेविया मॉडेल मागची २० वर्ष भारतात होतं. त्यानंतर ते कंपनीने बंद केलं. आता फेसलिफ्ट व्हर्जन भारतात १७ जानेवारीच्या आसपास लाँच होत आहे. इतर सर्व गाड्यांप्रमाणेच ऑक्टेवियामध्येही पुढे आणि पाठच्या बाजूला आता एलईडी दिवे असतील. आणि १४ इंचांचा एक मोठा डिजिटल डिस्प्लेही या गाडीत असेल. या डिस्प्लेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फिचर हे नवीन गाडीचं वैशिष्ट्य असेल.  (Skoda Octavia RS iV)

(हेही वाचा- हल्लेखोराने केली Saif Ali Khan कडे एक कोटींची मागणी)

गाडीत चालकाच्या शेजारी बसवण्यात आलेला नवीन फोनबॉक्स १५ वॅट क्षमतेने फोनचं वेगवान चार्जिंग करू शकतो. हा फोनबॉक्स एअर कंडिशन्ड आहे. कारण जास्त क्षमतेनं फोन चार्ज करताना तयार होणारी उष्णता तो कमी करतो. गाडीत बसवलेले युएसबी पोर्टही आधुनिक आणि जास्त क्षमतेचे आहेत.  (Skoda Octavia RS iV)

गाडीचं इंजिन जुनंच म्हणजे १.५ लीटरचं टर्बोचार्ज इंजिन आहे. पण, त्याची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने कंपनीने प्रयत्न केले आहेत. ही कार भारताबाहेर ऑगस्ट २०२४ मध्येच उपलब्ध झाली आहे. तिचे काही फोटो बघूया,

 ऑक्टेविया आरएस स्पोर्ट्स कार सारखी दिसेल अशी काळजी घेण्यात आली आहे. गाडीत चालकाच्या समोरही १० इंचांचा डिस्प्ले आहे. आणि गाडीत चालकाला मदत करणारी क्रूझ कंट्रोल यंत्रणाही आहे. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या गाडीत मागे बसलेल्या प्रवाशांसाठीही ए्अरबॅगची सोय करण्यात आली आहे. (Skoda Octavia RS iV)

(हेही वाचा- शिंदे गटाला धक्का; Sanjay Shirsat यांना सिडको अध्यक्षपदावरून हटवले)

याशिवाय टायरमध्ये हवेचा दाब किती आहे, मागे बसवण्यात आलेला कॅमेरा, अगदी चालक झोपाळलेला असेल तरी त्याचा इशारा या गाडीतील यंत्रणा देऊ शकेल. ही गाडी स्टँडर्ड ५ स्पीड गिअर किंवा ६ स्पीड गिअरमध्ये उपलब्ध होईल. आणि गाडीची किंमत ही ४५ लाख रुपयांपर्यंत असेल असा अंदाज आहे.  (Skoda Octavia RS iV)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.