Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर १७ आणि १९ जानेवारीला पॉवर ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक …

90
Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर १७ आणि १९ जानेवारीला पॉवर ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक ...
Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर १७ आणि १९ जानेवारीला पॉवर ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक ...

मध्य रेल्वेवर (Central Railway) आज 17 जानेवारी शुक्रवार आणि रविवार, 19 जानेवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (Power block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही काळासाठी उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत. याची नोंद घेऊन मुंबईकरांनी आज आणि रविवार, असे दोन्ही दिवस आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Central Railway)

हेही वाचा- NEET-UG 2025 : नीट यूजी परीक्षा यंदा पेन आणि पेपर मोडमध्ये होणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

मध्य रेल्वेच्या कर्जत स्टेशनमध्ये अभियांत्रिकी कामासाठी शुक्रवार आणि रविवारी दुपारी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. आज अर्थात शुक्रवारच्या ब्लॉक कालावधीत बदलापूर ते खोपोली (Badlapur to Khopoli) दरम्यान, तर रविवारच्या ब्लॉक कालावधीत नेरळ आणि खोपोलीदरम्यानच्या उपनगरी लोकल सेवा बंद राहणार आहेत. (Central Railway)

हेही वाचा- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार ? तारिख ठरली …

शुक्रवार, 17 जानेवारी रोजी दुपारी 1.50 ते 3.35 या दरम्यान ब्लॉक असेल. पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाइन तसेच कर्जत (कर्जत प्लॅटफार्म ३ च्या पनवेल दिशेकडे क्रॉसओवरसह) ते चौक, भिवपुरी स्टेशन (क्रॉसओवर वगळून) अप आणि डाउन लाइन दरम्यान हा ब्लॉक राहणार आहे. (Central Railway)

हेही वाचा- Mumbai Scam : टोरेस पाठोपाठ आणखी एक आर्थिक घोटाळा उघड; दोघाना अटक

रविवार, 19 जानेवारी रोजी दुपारी 11.20 ते 1.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य लाइन तसेच कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक, भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाउन लाइनवर ब्लॉक असेल, अशी माहिती आहे. (Central Railway)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.