-
ऋजुता लुकतुके
भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये अगदी पोर्श आणि मेकॅन पासून ते हुंडे आणि मारूतीच्याही नवीन गाड्या भारतात लाँच होणार आहेत. आणि त्यातीलच एक असेल मॉरिस गराज कंपनीची नवीन सायबरस्टर ही स्पोर्ट्सकार. दोन दरवाजांची ही देखणी स्पोर्ट्स कार म्हणजे कंपनीनेच वर्णन केल्याप्रमाणे ‘कार विथ द विंग्जस’ अशीच आहे. कंपनीची ही पहिली फक्त इलेक्ट्रिक असलेली कार आहे. आणि ४ रंगांमध्ये ती उपलब्ध असणार आहे. इंग्लिश व्हाईट, कॉस्मिक सिल्व्हर, इम्का येलो आणि डायनॅमिक लाल असे रंग गाडीला देण्यात आले आहेत. आणि रंग संगती तसंच किमतीप्रमाणे गाडीतील आतले फिचर आणि इंटिरिअर बदलणार आहे. (MG Cyberster)
(हेही वाचा- MG Gloster 2025 : एमजी ग्लॉस्टर फेसलिफ्ट दिसली भारतीय रस्त्यांवर, जानेवारीत होणार लाँच )
गाडीची बॅटरी ७७ तेडब्ल्यूएच क्षमतेची असेल. त्यामुळे एकदा चार्ज केल्यावर गाडी ५४१ किमी चालू शकेल. गाडीचं दुहेरी इंजिन ५१० बीएचपी आणि ७२५ एनएम पीक टॉर्क अशी कामगिरी बजावू शकेल. आणि ० ते १०० किमीचा वेग ही गाडी ३.२ सेकंदात गाठू शकेल. या गाडीची किंमत ६० ते ७० लाखांच्या दरम्यान असेल असा अंदाज आहे. (MG Cyberster)
For those who like cars with wings.
Introducing the MG Cyberster, with electric scissor doors.#MGSelect #MGCyberster pic.twitter.com/b89Uk570Mk— MG Select (@MGSelectIndia) December 9, 2024
भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पहिल्यांदा पक्ष्यांच्या पंखांप्रमाणे वर उघडणारे दरवाजे देण्यात आले आहेत. एका बटनाच्या क्लिकवर हे दरवाजे उघडबंद होतील. आणि त्यासाठी वेळही फक्त ५ सेकंदांचा लागणार आहे. एमजी कंपनी येत्या २ वर्षांत भारतातच काही महत्त्वाच्या इलेक्ट्रिक गाड्या आणणार आहे. आणि त्यांचा लुक आधुनिक असेल असा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यानुसार, सायबरस्टर गाडीचं इंटिरिअर बनवण्यात आलं आहे. गाडीत चालकाच्या स्टिअरिंग व्हीलवर अनेक कंट्रोल असतील. आणि छताची उघड-झाप पासून ते इतर अनेक कामं ही बटनाच्या क्लिकवर होतील. त्यासाठी वेगळी साधनं वापरावी लागणार नाहीत. (MG Cyberster)
(हेही वाचा- Mumbai Scam : टोरेस पाठोपाठ आणखी एक आर्थिक घोटाळा उघड; दोघाना अटक)
भारतात गाडी लाँच झाल्यानंतर प्री-बुकिंगही लवकरच सुरू होईल. (MG Cyberster)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community