-
ऋजुता लुकतुके
किया कंपनीने भारतात सब-एसयुव्ही गाड्यांची संख्या वाढवायचं ठरवलं आहे. आणि एका वर्षाच्या अंतराने कंपनीने अशा दोन गाड्या लागोपाठ लाँच केल्या आहेत. आता दुसरी गाडी आहे ती किया सायरॉस. ही गाडी १ फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. आणि तिचं उत्पादन कंपनीच्या आंध्रप्रदेशमधील अनंतपूर कारखान्यात सुरूही झालं आहे. विशेष म्हणजे प्री-बुकिंगमध्ये एका महिन्यात १०,२५८ लोकांनी या गाडीचं बुकिंग केलं आहे. १ फेब्रुवारीलाच गाडीची किंमत आणि इतर काही गोष्टी कळणार आहेत. (Kia Syros)
(हेही वाचा- Mumbai Scam : टोरेस पाठोपाठ आणखी एक आर्थिक घोटाळा उघड; दोघाना अटक)
कियाने ३ जानेवारीला आपली के१ प्लॅटफॉर्मवरील ही गाडी लोकांसमोर पहिल्यांदा आणली. ४ मीटरपेक्षा कमी लांबी असलेली ही कंपनीची दुसरी कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. सायरॉस गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचं इंटिरिअर आहे. यातील पाचही सीट छान व्हेंटिलेटेड आहेत. आणि मागच्या सीटही रिक्लाईन होतात. आणि गाडीत ३० इंचांचा एक मोठाच्या मोठा डिस्प्ले आहे. अर्थातच, चालकाच्या समोरचे सगळे कंट्रोल, इन्फोटेनमेंट तसंच इतर कंट्रोलही या एकाच डिस्प्लेत सामावलेले आहेत. पण, त्यामुळे गाडीचा लुक एकदम बदलून गेला आहे. (Kia Syros)
Kia Syros Launch
Kia India recently unveiled the highly anticipated Syros, a groundbreaking new compact SUV that promises to redefine the segment. The world premiere highlighted Kia’s vision of innovation, cutting-edge technology and bold design.
Event by: @SeventyEMG pic.twitter.com/h2cY30aNWz
— BlueFish Events (@bluefishevents) January 15, 2025
शिवाय हा डिस्प्ले पॅनोरमिक आहे. ॲपल कार, अँड्रॉईड ऑटो यांच्याशी जोडण्याची सुविधा तर आत आहेच. शिवाय गाडीचं सनरुफही आधुनिकी आणि एका क्लिकवर उघड – बंद होणारं आहे. गाडीत वायरलेस चार्जर, हरमनचे ८ स्पीकर असलेली साऊंड सिस्टिम आणि चालकाची फोर – वे पावर्ड सीट अशी वैशिष्ट्यही आहेत. (Kia Syros)
(हेही वाचा- NEET-UG 2025 : नीट यूजी परीक्षा यंदा पेन आणि पेपर मोडमध्ये होणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय)
चालकाच्या सुरक्षेसाठी एकूण १६ फिचर्स यात आहेत. यामध्ये गाडीची पुढून टक्कर होऊ नये साठीची यंत्रणा, पार्किंगसाठी ३६० अंशातील कॅमेरा, चालकाने लेन सोडू नये यासाठी इशारा देणारी यंत्रणा अशी फिचर्स आहेत. शिवाय गाडीत ६ एअरबॅग आहेत. गाडीतील इंजिनसाठी दोन पर्यात कंपनीने उपलब्ध करून दिले आहेत. १.५ लीटर क्षमतेचं पेट्रोल तसंच डिझेल इंजिन. ही दोन्ही इंजिन किया सॉनेटमधील आहेत. ६ स्पीडचा मॅन्युअल तसंच ऑटोमेटिक गिअर बॉक्सचा पर्यायही ग्राहकांना आहे. (Kia Syros)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community