Delhi Elections राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ उमेदवार; २० स्टार प्रचारक मैदानात !

Delhi Elections : महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळातील कोणाचाही नंबर नाही

98
Delhi Elections राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ उमेदवार; स्टार प्रचारक फक्त २०!
Delhi Elections राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ उमेदवार; स्टार प्रचारक फक्त २०!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ११ उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, प्रचारासाठी 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या यादीत महाराष्ट्रातील कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश नाही, ज्यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (Delhi Elections)

(हेही वाचा- Central Railway : प्रवाशांनो लक्ष द्या ! मध्य रेल्वेवर १७ आणि १९ जानेवारीला पॉवर ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक …)

स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत पार्थ पवार, सुबोध मोहिते पाटील, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, धीरज शर्मा, चैतन्य मानकर यांचाही समावेश आहे. हे नेते पक्षाच्या ११ उमेदवारांसाठी प्रचार मोहीम राबवणार आहेत. (Delhi Elections)

महाराष्ट्रातील ८ कॅबिनेट मंत्री आणि एका राज्यमंत्र्यांना मात्र या यादीत स्थान मिळालेले नाही. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली जायची. त्यामध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे यांसह महाराष्ट्रातील अनेक मंत्री आणि नेते समाविष्ट असायचे. मात्र, अजित पवारांच्या गटाने स्टार प्रचारकांची संख्या कमी करत २० ने नेमली असून, त्यात महाराष्ट्रातील मंत्री वगळले गेले आहेत.  (Delhi Elections)

(हेही वाचा- आता सरकारी कार्यालयात खेटे मारणे होणार बंद; Government Services मिळणार मोबाईलवर)

ही रणनीती पक्षाचा राष्ट्रीय स्तरावरील विस्तार लक्षात घेऊन आखण्यात आली असल्याचे मानले जाते. मात्र, महाराष्ट्रातील मंत्र्यांना यादीत न समाविष्ट केल्याने पक्षातील गटबाजीच्या चर्चाही पुन्हा रंगल्या आहेत. दिल्ली निवडणुकीत राष्ट्रवादीच्या यशावर या निर्णयाचा परिणाम होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  (Delhi Elections)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.